म्यानमार पेटले, अल्पसंख्याकावर 4 बॉम्ब टाकले, हल्ल्यात 60 जण जळून खाक…

| Updated on: Oct 24, 2022 | 10:35 PM

काचिन आर्ट्स असोसिएशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, रविवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात 60 लोकं ठार झाली आहेत.

म्यानमार पेटले, अल्पसंख्याकावर 4 बॉम्ब टाकले, हल्ल्यात 60 जण जळून खाक...
Follow us on

बँकॉकः म्यानमारमधील (Myanmar) वांशिक अल्पसंख्याक (Ethnic minorities) वाद जोरदार उफाळून आला आहे. यामध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात गायक आणि संगीतकारांसह 60 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा हल्ला काचिन वांशिक अल्पसंख्याक (Kachin ethnic minority) गटाच्या मुख्य राजकीय संघटनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित होते, त्याचवेळी हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर त्याच गटातील सदस्यांनी आणि बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याची माहिती दिली.

या हल्ल्याबाबत काचिन आर्ट्स असोसिएशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, रविवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात 60 लोकं ठार झाली आहेत.

तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. लष्करी विमानातून कार्यक्रम चालू असतानाच चार बाँब टाकण्यात आले.

या हल्ल्यानंतर म्यानमारमधील वाढत्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आग्नेय आशियाई देशांचे परराष्ट्र मंत्री इंडोनेशियामध्ये विशेष बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर रविवारी रात्री एका समारंभात झालेल्या हवाई हल्ल्यात चार बाँब टाकल्याने अनेक जण त्यामध्ये ठार झाले आहेत.

लष्करी किंवा राज्य माध्यमांकडून या हल्ल्यांबद्दल तात्काळपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. म्यानमारमधील संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, हवाई हल्ल्याच्या या कृत्तीमुळे त्यांनी दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे.

नि:शस्त्र नागरिकांविरुद्ध सुरक्षा दलांनी आपल्या बळाचा वापर करुन त्यांच्यावर हल्ला करणे हे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटेल आहे.

म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्याकांच्या स्वायत्ततेच्या मागण्या अनेक दशकांपासून मान्य करण्यात आल्या नाहीत, त्या दाबून ठेवण्यात आल्या आहेत.

काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशनच्या स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी त्या ठिकाणी साजरे केले जात होते.

ज्याचा उपयोग काचिनच्या लष्करी शाखेकडून लष्करी प्रशिक्षणासाठी केला जातो. हे म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यांगूनपासून सुमारे 950 किमी अंतरावर हपाकांत प्रदेशात आहे.