
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक ऐतिहासिक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. मोदी यांना 26 अधिक देशांनी त्यांच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने गौरवले आहे. असे करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अलिकडे त्यांना नामिबिया, घाना आणि ब्राझीलने सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला आहे. तर घाना सरकारने मोदी यांना’ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ (Officer of the Order of the Star of Ghana) पुरस्काराने गौरवले आहे. हा पुरस्कार त्यांची नेतृत्व क्षमता आणि भारत-घाना संबंध मजबूत करण्यात बहमुल्य योगदान दिल्याबद्दल देण्यात आला आहे. मोदी यांनी घानाचा हा पुरस्कार घानाची जनता आणि युवकांना समर्पित केला असून हा पुरस्कार भारत-घाना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.
याआधी नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी यांना सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्याआधी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष इनासियो लूला दा सिल्वा यांनी मोदी यांचा ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊदर्न क्रॉस ( Grand Collar of the National Order of the Southern Cross ) या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने गौरवले आहे.
हा पुरस्कार त्यांना भारत-ब्राझील द्वीपक्षीय संबंधांना मजबूत करण्यासाठी देण्यात आला आहे.
| देश | नागरिक पुरस्कार |
|---|---|
| सौदी अरब | ऑर्डर ऑफ किंग अब्दुलअजीज अल सऊद |
| संयुक्त अरब अमीरात | ऑर्डर ऑफ जायेद |
| रशिया | ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू |
| ब्राझील | ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साउदर्न क्रॉस |
| घाना | ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना |
| मालदीव | ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इज्जुद्दीन |
| बहारीन | किंग हमद ऑर्डर ऑफ द रिनेसां |
| अमेरिका | लीजन ऑफ मेरिट |
| सायप्रस | ड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस थर्ड |
| मॉरिशस | ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड की ऑफ द इंडियन ओशन |
| कुवैत | ऑर्डर मुबारक अल कबीर |
| गयाना | ऑर्डर ऑफ द फ्रीडम |
| नायजेरिया | ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द फेडरल रिपब्लिक |
| डोमिनिका | डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर |
| ग्रीस | ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर |
| पॅलेस्टाईन | ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन |
| अफगानिस्तान | स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान |
| इजिप्त | ऑर्डर ऑफ द नाईल |
| नामिबिया | ऑर्डर ऑफ द मोस्ट एंशिएंट वेलविट्सकिया मिरेबिलिस |
| त्रिनिदाद व टोबैगो | र्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद एंड टोबैगो |
| पलाऊ | एबाकल अवॉर्ड |
| पापुआ न्यू गिनी | ऑर्डर ऑफ लोगोहू |
| फिजी | कंपैनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी |
| भूतान | ऑर्डर ऑफ द द्रुक ग्यालपो |
| तिमोर | लेस्ते ग्रँड ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्ते |
साल 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना लागोपाठ अनेक देशांकडून त्यांचे सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळालेले आहेत. काही मुस्लीम बहुल देशांनीही मोदी यांचा गौरव केला आहे. या देशात सौदी अरब, यूएई, बहारीन, अफगानिस्तान, पॅलेस्टाईन, कुवैत सारख्या देशांनी देखील त्यांना आपला सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन गौरवले आहे. हे केवळ मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना दर्शवत नाही तर जगभरात भारताची वैश्विक ओळख आणि भूमिका किती मजबूत झाली आहे याचेही निदर्शक आहे.
आतापर्यंत 26 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. यात आशिया, युरोप,आफ्रीका, आखाती देश, ओशिनिया आणि अमेरिकेतील देशांचा समावेश आहे. 2016 पासून आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या दशाकडून हा मान मिळत आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणत देशातील 140 कोटी जनतेच्या आकांक्षांना आणि विकासाच्या स्वप्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जात आहेत.