AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार? तुमचा खिसा कापल्या जाणार? ती अपडेट वाचली का?

Crude Oil Price Hike: मध्य-पूर्वेतील युद्धाने कच्चा तेलाच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. वर्षभरात होणारी वाढ अवघ्या एका महिन्यात झाली आहे. LPG सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार? तुमचा खिसा कापल्या जाणार? ती मोठी अपडेट काय?

LPG सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार? तुमचा खिसा कापल्या जाणार? ती अपडेट वाचली का?
एलपीजी सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 18, 2026 | 2:14 PM
Share

Petrol-Diesel Price: मध्य-पूर्वेतील युद्धाने सर्व जगाला वेठीस धरले आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. जगभरात वस्तू महागल्या आहेत. भारतात गॅस संकट उभे ठाकले आहे. LPG सिलेंडरच्या तुटवड्याने नागरीक हैराण झाले आहेत. जादा भाव देऊन अनेक जण गॅस सिलेंडर विकत घेत आहेत. तर सर्वसामान्यांना लांबच लांब रांगेत उभे राहून सिलेंडरची वाट पाहावी लागत आहे. मिळाला तर सणाचा गोडावा नाहीतर दुसर्‍या दिवशी पुन्हा रांगेत अशी त्यांची अवस्था आहे. त्यातच गॅस सिलेंडर पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही वाढणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामागे कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याची बातमी आहे. सध्या कच्चा तेलाच्या किंमती 119 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्याने तेल कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे.

एकाच महिन्यात वर्षभराची उसळी

आकड्यांवर नजर टाकली तर बाजाराची भीती स्पष्ट होईल. सध्या अमेरिकन बेंचमार्क WTI क्रूडची किंमत जवळपास 94.99 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. ब्रेंट क्रूड 102.65 डॉलरच्या स्तरावर आहे. रोजच्या किंमतीत थोडाफार चढउतार दिसून येत आहे. पण युद्ध सुरू झाल्यापासून कच्चा तेलाच्या किंमती 65 ते 75 डॉलरदरम्यान होत्या. आज या किंमती 100 डॉलरच्या पुढे पोहचल्या आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका वर्षात होणारी वाढ अवघ्या एका महिन्यात झाली आहे. कच्चा तेल्याच्या किंमतीत 43 टक्क्यांहून अधिकची उसळी दिसून आली.एका वर्षात इतकी वाढ अपेक्षित मानली जाते.

पुरवठा साखळीवर सर्वात मोठा परिणाम

पश्चिम आशियात सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. हा भागच जगाचा इंधन पुरवठ्याचे केंद्र आहे. जेव्हापासून या भागात तणाव वाढला आहे. तेव्हापासून जागतिक इंधन पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाल्याचे मानले जात आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे मानले जात आहे. युद्धामुळे मालवाहू जहाजांना मोठा धोखा निर्माण झाला आहे. याशिवाय अनेक देशांचे छुप्या हेतूमुळे इंधनाच्या किंमतींना उकळी फुटली आहे. हे एक भूराजकीय वादळ आहे. त्यात भारतासह चीन,रशिया आणि ब्रिक्स देशांना टार्गेट करण्यात येत आहे.

तुमच्या खिशाला झळ बसणार?

जेव्हा जागतिक बाजारात कच्चे तेल महाग होते, तेव्हा त्याचा फटका ग्राहकांना बसतो. त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होतो. इंधन महाग होते. अगोदरच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे. त्यात एलपीजी सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांचा संताप होत आहे. आता पेट्रोल-डिझेल पण त्यांच्या खिशावर दरोडा घालणार का, अशी चर्चा होत आहे. डिझेल महागल्यास रोजच्या वापरातील वस्तू, भाजीपाला, फळं, किराणा आणि इतर वस्तू महाग होईल आणि सर्वांनाच त्याचा फटका सहन करावा लागेल.

Follow Us
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?