AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Floods: जलप्रलयाचा हायअलर्ट, नैसर्गिक संकटात मोठे नुकसान, भारतीयांना बालेश शाह सरकार भरपाई देणार?

Indians Affected in Nepal Floods: नेपाळमध्ये जलप्रलयाचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी आलेल्या महापूराने उत्तरी नेपाळमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी अनेक परदेशी पर्यटक नागरिक अडकले आहेत. काही कामगार आहेत. त्यांना नेपाळ सरकार भरपाई देणार का?

Nepal Floods: जलप्रलयाचा हायअलर्ट, नैसर्गिक संकटात मोठे नुकसान, भारतीयांना बालेश शाह सरकार भरपाई देणार?
भारतीयांना बालेश शाह सरकार भरपाई देणार?
| Updated on: Aug 30, 2026 | 12:58 PM
Share

Indians Affected in Nepal Floods: नेपाळमध्ये महा जलप्रलय आहे. उत्तर नेपाळमधील भोटेकाशी आणि त्रिशुला नद्यांमधून जणू यमदूत आला. या महापूरात 600 हून अधिक लोकांचा जीव गेला. तर 2500 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यात अनेक परदेशातील नागरिकांसह 320 भारतीयांचा समावेश आहे. बचाव आणि शोध कार्य जोरात सुरू आहे. त्यातच ज्या भारतीयांचा या नैसर्गिक संकटात जीव गेला अथवा त्यांचे मोठे नुकसान झाले, त्यांना नेपाळ सरकार भरपाई देणार का? असा सवाल विचारल्या जात आहे.

अद्याप अधिकृत घोषणा नाही

नेपाळमध्ये भारतीय बचाव पथक दाखल झाले आहेत. चीनच्या पथकालाही परवानगी देण्यात आली आहे. भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियातील तज्ज्ञांची टीम आणि शोध पथकाला नेपाळने परवानगी दिली आहे. नेपाळने आतापर्यंत परदेशी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसान भरपाईची घोषणा केली नाही. नेपाळ सरकारने तिबेट सीमेवर आणि उत्तर भागात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या सुटकेसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. ते या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत.

नेपाळ सरकार भारतीयांना नुकसान भरपाई देणार?

असा कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा नाही. ज्यानुसार, परदेशी नागरिकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी दबाव टाकता येत नाही. नेपाळमधील राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, भरपाई, पुनर्वसन आणि मदतीचे काम देशातंर्गत करण्यात येते. सध्या सरकार परदेशी नागरिकांची माहिती जमा करणे, त्यांच्या ठावठिकाणाची माहिती घेणे, त्यांची सुखरूप सुटका करणे आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवणे याला सरकार सध्या प्राधान्य देत आहे.

मग कसा मिळेल भरपाई?

ट्रॅव्हल वा जीवन विमा

ज्या भारतीयांनी आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला आहे. त्यातंर्गत त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. मेडिकल खर्च वा दुसऱ्या नियमानुसार, जोखि‍मेनुसार नेपाळमध्ये गेलेल्या भारतीयांना भरपाईसाठी दावा करता येऊ शकतो. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत भरपाई मिळू शकते. वारसदार त्यानुसार दावा दाखल करू शकतात.

कंपनीची जबाबदारी

अनेक भारतीय रोजगारासाठी नेपाळमध्ये आहेत. यामध्ये हायड्रोपॉवर प्रकल्प आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर वा व्यावसायिक कामांचा समावेश आहे. कामावर असताना ते जर या महापूराच्या विळख्यात अडकले. त्यांच्या संपत्ती वा जीवाचे नुकसान झाल्यास संबंधीत कंपनी, संस्था भरपाई देण्यासाठी जबाबदार ठरतात.

Follow Us
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...