अखेर नेपाळला चूक आली लक्षात, भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, घेतला मोठा निर्णय..
India Nepal : भारत आणि नेपाळमधील संबंध कायमच चांगली राहिली. मात्र, आता कुठे ना कुठे हे संबंध तणावात आलीत. हा तणाव कमी करण्याकरिता दोन्ही देशांकडून मोठी पाऊले उचलली जात आहेत. आता नेपाळचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दाैऱ्यावर आहेत.

नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध कायमच चांगली राहिली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे संबंध तणावात आहेत. नेपाळकडून विविध दावे केले जात आहेत. ज्या ज्यावेळी नेपाळला भारताची मदत लागली, त्यावेळी भारत नेपाळच्या मदतीला धावून आला. नेपाळला काही दिवसांपूर्वीच मोठी मदत भारताने केली. नेपाळच्या काही जिल्ह्यांमधील शाळांच्या पुर्नंबांधणीकरिता मोठा निधी भारताने दिला. मात्र, तरीही नेपाळकडून भारताबद्दल धक्कादायक विधाने केली जात आहेत. या आठवड्यात नेपाळचे प्रमुख नेते भारताच्या दौऱ्यांची मालिका करत आहेत. नेपाळच्या सत्ताधारी नॅशनल इंडिपेंडंट पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने भारत दौऱ्यावरून परतले आणि त्यांच्या काठमांडूला परतल्यानंतर लगेचच नेपाळी परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी तीन दिवसांच्या भारत दौऱ्याला सुरुवात केली.
भारतासोबतचे संबंध तणावात येत असल्याचे लक्षात येताच नेपाळने आता एक पाऊल मागे घेतले. राजनैतिक वर्तुळात नेपाळी पंतप्रधान बलेंद्र शाह (बालेन शाह) यांनी घेतलेली एक सुधारात्मक भूमिका म्हणून बघितले जात आहे. भारताच्या भूमीबद्दल बालने शाह यांनी धक्कादायक विधान केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या निमंत्रणावरून नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल आज भारत दाैऱ्यावर येणार आहेत.
भारत नेपाळ संबंधांमधील अलीकडील तणावानंतर सामान्य स्थिती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जातंय. लामिछाने भारत दाैऱ्यावर होते, त्यावेळी भारताने ज्यापद्धतीने त्यांचे स्वागत केले आणि सन्मान दिला, ज्याने ते देखील हैराण झाले. आता नेपाळचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दाैऱ्यावर आहेत.
भारताला नेपाळसोबत संबंध चांगले ठेवायचे आहेत. कारण भारताच्या शेजारील देश पाकिस्तान आणि बांगलादेशासोबत संबंध तसे तणावातच आहेत. मागील काही वर्षांचा विचार करता भारताचे सध्या चीनसोबत संबंध ठीक आहेत. त्याचे कारण रशिया आहे. रशियाने भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याकरिता नक्कीच प्रयत्न केली. भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये नेपाळसोबतचे संबंध खराब होऊ द्यायचे नाहीत. कारण याचा फायदा शत्रू देश नक्कीच घेऊ शकतात.