ब्लँकेटवर झोपवतो जल्लाद, मग छातीत झाडतो गोळी; यमनमध्ये निमिषा हिला कसा देणार मृत्यूदंड?

Nimisha Priya Yemen : भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला यमनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यमनमध्ये मृत्याची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला अत्यंत वाईट पद्धतीने मारण्यात येते. व्यक्तीच्या छातीत आणि पाठीत अनेक गोळ्या झाडण्यात येतात.

ब्लँकेटवर झोपवतो जल्लाद, मग छातीत झाडतो गोळी; यमनमध्ये निमिषा हिला कसा देणार मृत्यूदंड?
निमिषा प्रिया
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 10, 2025 | 11:14 AM

यमनमध्ये हत्याप्रकरणात दोषी ठरलेली परिचारिका, नर्स निमिषा प्रिया हिला मृत्यूदंडाची शिक्षा तिथल्या न्यायालयाने सुनावली. ती मुळची केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तिला 16 जुलै रोजी मृत्यूदंड देण्यात येईल. ही शिक्षा रद्द व्हावी यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे या गावाची रहिवासी निमिषा हिला जुलै 2017 मध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. ती व्यक्ती प्रियाची व्यावसायिक भागीदार होती.

2020 मध्ये सुनावण्यात आली शिक्षा

या प्रकरणाची दीर्घ सुनावणी चालली. 2020 मध्ये स्थानिक न्यायालयाने तिला हत्येप्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्याविरोधात तिने यमनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेकडे नोव्हेंबर 2023 मध्ये अपील केले होते. ते खारीज झाले. निमिषा सध्या यमनची राजधानी सना येथील तुरुंगात आहे. यमनवर सध्या इराण समर्थित हुती बंडखोरांचे नियंत्रण आहे.

यमनमध्ये मृत्यूदंड सुनावण्यात आलेल्या व्यक्तीला अत्यंत निर्घृणपणे मारण्यात येते. काही प्रकरणात सार्वजनिकरित्या फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर काही प्रकरणात दोषीचे धड शरीरापासून वेगळे करण्यात आले आहे. तर आता हे सर्व प्रकार मागे टाकत यमनमध्ये त्यापेक्षा जलद शिक्षा देण्यात येते. आता थेट छातीत आणि पाठीत गोळ्या घालण्यात येता. यमनमध्ये मृत्यूदंडाचे प्रकार इतर देशांपेक्षा अधिक आहे.

मरेपर्यंत शरीरात गोळ्या

एका वृत्तानुसार, सध्या यमनमध्ये गोळी झाडून व्यक्तीला मृत्यूदंड देण्यात येतो. एका ब्लँकेटवर व्यक्तीला झोपावण्यात येते. जल्लाद राय़फलने त्याच्या पाठीवर आणि नंतर छातीवर अनेक राऊंड फायरिंग करतो. त्याच्या हृदयावर जवळून गोळ्या झाडण्यात येतात. त्यामुळे व्यक्तीचा लागलीच मृत्यू ओढावतो.

प्रियाची आई यमनमध्ये

मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर गेल्या वर्षी प्रियाची आई तिला वाचवण्यासाठी यमनमध्ये धावली. ती अजूनही तिला वाचवण्यासाठी तिथल्या कोर्ट कचेरीत आणि प्रशासनाकडे मदत मागत आहे. भारत सरकार पण प्रयत्न करत आहे. पण यमनवर सध्या हुती बंडखोरांचे नियंत्रण आहे. त्यांच्याशी भारत सरकारचा अधिकृत संपर्क नसल्याने अडचणी येत आहेत. दियात आणि ब्लड मनी देऊन प्रियाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरात पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देऊन आरोपीची शिक्षा कमी करणे अथवा माफ करता येते.