AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 लाख लग्न, 90 लिव्ह इनसाठी अर्जफाटे…एका कायद्याने उडवली या राज्यातील लोकांची झोप

2 lakh marriages, 90 applications for live-in : 27 जानेवारीपासून राज्यात नवीन कायदा लागू झाला. तेव्हापासून 2 लाख लग्न आणि 90 लिव्ह इन रिलेनशनशिपसाठी अर्जफाटे करण्यात आले आहे. नागरिकांची मोठी धावपळ सुरू आहे.

2 लाख लग्न, 90 लिव्ह इनसाठी अर्जफाटे...एका कायद्याने उडवली या राज्यातील लोकांची झोप
नोंदणीची घाईImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 10, 2025 | 10:21 AM
Share

Uttarakhand UCC : उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा (UCC) या वर्षाच्या सुरुवातीला 27 जानेवारीपासून लागू झाला. या कायद्यातंर्गत नागरिकांना नोंदणीसाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी या 27 जुलै रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे लग्न, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप नोंदणीसाठी लोकांची एकच गडबड उडाली आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे.

राज्यात 27 जानेवारी 2025 पासून युसीसी लागू झाला. त्यानुसार, 26 मार्च, 2010 पासून ते युसीसी लागू होईपर्यंत सर्व लग्न, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेनशिपची नोंदणी करणे अनिवार्य, सक्तीचे आहे. या कायद्याचा उद्देश सर्व नागरिकांना समान अधिकार देण्याचे निश्चित करणे आहे. या कायद्यानुसार, लैंगिक समानता, बहुपत्नीत्व थांबवणे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पारदर्शकता आणणे आणि इतर अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी युसीसी लागू झाल्यानंतर आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लग्न आणि 90 लिव्ह इन रिलेशनशिप अर्ज आले आहेत. त्यांची नोंद करण्यात आली आहे. या कायद्यानुसार, 26 मार्च, 2010 पासून ते युसीसी लागू झाल्यापर्यंत जितके विवाह, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप आहेत, त्यांना या सहा महिन्यात नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी 27 जुलै 2025 ही अंतिम मुदत होती. सुरुवातीला विरोध करणारे अनेक लोक आता या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभागी होत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिप समोर आणण्याचे धाडस कमी लोकांनी दाखवले आहे. राज्यातून केवळ 90 जोडप्यांनीच नोंदणासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे त्यावर 14 जुलै रोजी सुनावणी होत आहे. लिव्ह इनसाठी जे अर्ज आले आहेत. त्यातील 72 जणांना या नातेसंबंधातून मुलं झाल्याचे समोर आले आहेत. या अर्जदारांच्या मुलांना विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांप्रमाणेच कायद्याने समान अधिकार मिळतील. सुरुवातीला युसीसीवरून देशभरात रणकंदन माजले होते. पण भाजपा हा कायद्या आणण्याच्या बाजूने आहे. उत्तराखंडात हा कायदा लागू झाला. ही लिटमीस टेस्ट असल्याचे समजते. जिथे भाजपशासित राज्य आहेत, तिथे हा कायदा उत्तराखंडातील अनुभवानंतर लागू होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.