खास महिलांनाच टार्गेट, महाराष्ट्रापर्यंत धर्मांतरणाचे रॅकेट, छांगूर बाबाच्या माया जालाचे भयानक सत्य, इतक्या हिंदू मुलींचे धर्म परिवर्तन
Changur Baba Conversation Racket : उत्तर प्रदेशातील छांगूर बाबाच्या काळा कारनाम्यांनी देश हादरला आहे. महाराष्ट्रापर्यंत त्याचे धर्मांतराचे रॅकेट सुरू असल्याचे समोर आल्यापासून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हादरली आहे. त्याने इतक्या हिंदू महिलांचे धर्मांतरण केले आहे.

उत्तर प्रदेशातील जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबाच्या काळ्या कारनाम्यांनी देश हादरला आहे. महाराष्ट्रापर्यंत त्याच्या धर्मांतरणाचे रॅकेट पसरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सुद्धा हादरली आहे. या जलालुद्दीने अनेक हिंदू मुलींचे धर्मांतरण केल्याचे समोर आले आहे. बलरामपूर येथील जलालुद्दीनच्या आलिशान बंगल्यावर योगी सरकारने बुलडोझर फिरवला आहे. त्याचे दुबईपर्यंतचे कनेक्शन समोर आले आहे. त्याला फंडिंग करणाऱ्या एजन्सीज आता एटीएसच्या रडारवर आल्या आहेत. त्याचे दहशतवादी संघटनांशी तर संबंध नाहीत ना, याची कसून तपासणी करण्यात येत आहे.
गुरू आणि चेलीचे धर्मांतरणाचे रॅकेट
जलालुद्दीन याने आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, 1500 हिंदू महिलांचे धर्मांतरण केले आहे. त्याने हजारो महिलांना लक्ष्य केले. या महिलांच्या मार्फत तो एक मोठे संघटन तयार करण्याच्या तयारीत होता. त्यामागे त्याचे खतरनाक मनसुबे असल्याचे समोर येत आहे. या छांगूरचे स्वीस बँकेत खाती असल्याची माहिती समोर येत आहे. आता सर्व प्रमुख राष्ट्रीय तपास यंत्रणांनी त्याच्याकडे मोर्चा वळवला आहे. त्याची पट्टशिष्या नीतू रोहरा आता नसरीन हिने हिंदू महिलांना धर्मांतरीत करण्यासाठी दबाव आणला. या दबावातून तिने हजारो हिदू मुलींचे धर्मांतरण केले. नसरीनला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
या महिला होत्या टार्गेट
एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, छांगूरने जवळपास 1500 हिंदू महिला आणि मुलींचे धर्मांतरण केले. विधवा, निपुत्रिक, परितक्त्या, पतीशी वाद झालेल्या, कुटुंबापासून एकट्या राहणाऱ्या, मानसिकदृष्ट्या कमकुवत महिलांना तो लक्ष्य करायचा. त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली, चमत्कार, बुवाबाजी, उपचाराच्या नावाखाली तो या महिलांना फसवायचा. त्यानंतर त्यांचा ब्रेनवॉश करायचा. त्यानंतर त्यांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकायचा. पीर, रुहानीबाबा, मसीहा अशी त्याची प्रतिमा तयार करण्यात नसरीन आणि त्याची गँग यशस्वी झाली होती. त्याचा फायदा धर्मांतरणासाठी करण्यात येत होता.
अवैध धर्मांतरणाचे रॅकेट
जलालुद्दीन हाच नाही तर त्याचे नातेवाईक सुद्धा अवैध धर्मांतरणाच्या रॅकेटमधील म्होरके आहेत. अनेक हिंदू महिलांचे धर्मांतरण करण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्फतच इतर हिंदू मुलींचे धर्मांतरण करण्याची मोहीम जलालुद्दीन आणि त्याच्या नातेवाईकाने सुरू केली होती. काही ठिकाणी तर त्यांनी सार्वजनिक धर्मांतरण कार्यक्रम घेतल्याचे माहिती पण समोर येत आहे. आजमगढ भागात असे कार्यक्रम घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईंकाविरोधात सक्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.
