AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nirav Modi : पळपुटा नीरव मोदी याला मोठा झटका, आता भारतात यावंच लागणार, सरकारच्या प्रयत्नांना यश

फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीला मोठा धक्का बसला आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याप्रकरणी भारतात प्रत्यार्पणाला आव्हान देणारी त्याची याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या निर्णयामुळे मोदीचे भारतात प्रत्यार्पण आता निश्चित झाले आहे. CBI च्या अथक प्रयत्नांमुळे हे आव्हान यशस्वीपणे परतवून लावण्यात आले. 13 हजार कोटींच्या घोटाळ्यात मोदीचा सहभाग असून, तो 2019 पासून यूकेमध्ये तुरुंगात आहे.

Nirav Modi : पळपुटा नीरव मोदी याला मोठा झटका, आता भारतात यावंच लागणार, सरकारच्या प्रयत्नांना यश
नीरव मोदी
| Updated on: Mar 26, 2026 | 8:09 AM
Share

फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला (Nirav Modi) मोठा धक्का बसला आहे. 13 हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदीने, त्याला भारतात प्रत्यार्पणासाठी पाठवण्यासंदर्भातील खटला पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र मोदी याची भारतात होणाऱ्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नीरव मोदी हा एक फरार आर्थिक गुन्हेगार असून, मामा मेहुल चोक्सी याच्यासोबत पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर भारतात खटला सुरू आहे. एकट्या नीरव मोदीवर 6,498.20 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. 19 मार्च 2019 पासून नीरव मोदी हा यूकेच्या न्यायालयात तुरुंगवासात आहे.

नीरव मोदीने यापूर्वी उच्च न्यायालयाच्या किंग्ज बेंच खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या वकिलांनी, केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) पथकाच्या मदतीने, त्याच्या याचिकेच्या विरोधात युक्तिवाद सादर केला. तपास अधिकाऱ्यांसह सीबीआय अधिकाऱ्यांचे एक पथक सुनावणीसाठी लंडनला गेलं होतं.

नीरव मोदीची याचिका फेटाळली

नीरव मोदीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे, असं सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटलं.  “शस्त्र विक्रेता संजय भंडारी प्रकरणातील निकालाच्या आधारे या प्रकरणाची पुन्हा सुनवाई व्हावी, यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सीबीआयचे सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्न यांमुळे या आव्हानावर यशस्वीपणे मात करण्यात आली,” असं त्यांनी नमूद केलं.

याचिका आणि त्यासंबंधित परिस्थिती इतकी असाधारण नाही, की प्रकरणाची फेरसुनावणी करणे आवश्यक ठरेल असं नीरव मोदीची याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटल्याचं प्रवक्त्याने सांगितलं. “सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतील मोठ्या आर्थिक गडबडीशी संबंधित पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणी करत असून, या प्रकरणाची कार्यवाही 2018 पासून सुरू आहे,” असे ते म्हणाले.

एका सरकारी बँकेशी संबंधित मोठ्या आर्थिक घोटाळ्यात मोदींचा सहभाग असल्याचा हवाला देत, CBI कडून 2018 सालापासूनच नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात येत आहे. सीबीआयच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, २०१९ मध्ये मोदींच्या अटकेनंतर यूकेच्या न्यायालयांनी त्यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती आणि त्यांची पूर्वीची अपीले फेटाळली होती. न्यायालयांना कोणतीही कायदेशीर त्रुटी आढळली नाही आणि भारतातील त्यांच्या वागणुकीबाबत दिलेली आश्वासने त्यांनी स्वीकारली, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?