डोनाल्ड ट्रम्प यांना नडला अतिशहाणपणा, नोबेल पुरस्कार समितीच्या अध्यक्षांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, ट्रम्प कधीच…

डोनाल्ड ट्रम्प सतत नोबेल शांतता पुरस्कारासाठी दावा करत असताना देखील त्यांना हा पुरस्कार देण्यात आला नाहीये. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता अमेरिकेने चांगलाच संताप व्यक्त केला. त्यानंतर नोबेल पुरस्कार समितीच्या अध्यक्षांनी सर्वांना हैराण करणारा खुलासा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना नडला अतिशहाणपणा, नोबेल पुरस्कार समितीच्या अध्यक्षांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, ट्रम्प कधीच...
Donald Trump and Chairman Jorgen Watne Fridnes
| Updated on: Oct 10, 2025 | 7:32 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत नोबेल शांतता पुरस्कारासाठी दावा करताना दिसले. जगातील 8 मोठी युद्ध मी रोखली असे परत परत सांगताना ते दिसले. नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होण्याच्या काही तास अगोदरच त्यांनी इस्त्रायल-हमास युद्धबंदीची घोषणा केली. शिवाय 20 कलमी प्रस्तावातील पहिला टप्प्यासाठी दोन्ही देशांनी शांतता करारावर सह्या केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करताना दिसले. व्हेनेझुएलाच्या लोकशाही समर्थक कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार मिळाला. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना रशियाने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाला समर्थन दिले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नसल्याने त्यांची मोठी हिरमोड झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प जर जगातील मोठी आठ युद्धे रोखल्याचा दावा करतात तर त्यांना नोबेल शांतता पुरस्कार नेमका का मिळाला नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेवटी नोबेल पुरस्कार समितीनेच यावर थेट स्पष्टीकरण दिले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार न मिळण्याचे कारणही पुढे आलंय.

नोबेल पुरस्कार घोषणेनंतर बोलताना नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॉर्गेन वॅट्ने फ्रिडनेस यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हा पुरस्कार का मिळाला नाही? यावर भाष्य केले. हेच नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देत म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प हे कधीच नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत नव्हते. जॉर्गेन वॅट्ने फ्रिडनेस यांनी म्हटले की, समितीने सर्व प्रकारच्या माध्यमांवर आणि मोहिमेवर बारीक लक्ष ठेवले होते.

या पुरस्कारासाठी आमच्याकडे हजारो पत्र येतात. आम्ही आमचा निर्णय केवळ अल्फ्रेड नोबेलच्या कार्यावर आणि इच्छेवर आधारित करतो. आम्ही ज्या खोलीत बसतो तिथे हजारो फोटो आहेत. नोबेल समितीने मचाडो यांना महत्वाचे एकात्म व्यक्तिमत्व म्हणून वर्णन केले. डोनाल्ड ट्रम्प यांना शेवपर्यंत अपेक्षा होती की, त्यांना हा पुरस्कार मिळेल, त्यासाठी त्यांच्याकडून दबाव तंत्राचा वापर देखील करण्यात आला.