उत्‍तर कोरियाचा प्रमुख आणि जगप्रसिद्ध हुकुमशाह किम जोंग नागरिकांसमोर का रडला?

उत्तर कोरियाचा प्रमुख आणि हुकुमशाहा किम जोंग उनने (kim jong un) पहिल्यांदाच आपल्या अपयशासाठी नागरिकांसमोर माफी मागितली आहे.

उत्‍तर कोरियाचा प्रमुख आणि जगप्रसिद्ध हुकुमशाह किम जोंग नागरिकांसमोर का रडला?
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 12:31 AM

पोंगयाँग : उत्तर कोरियाचा प्रमुख आणि हुकुमशाहा किम जोंग उनने (kim jong un) पहिल्यांदाच आपल्या अपयशासाठी नागरिकांसमोर माफी मागितली आहे. असं होण्याची ही पहिलीच वेळ आहे (North Korea dictator kim jong Un cry before people for failure in COVID period).

‘द गार्डियन’ वृत्तापत्राने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उनने कोरोना साथीरोगाच्या अडचणीच्या काळात त्यांचं सरकार कमी पडल्याने नागरिकांची माफी मागितली आहे. इतकंच नाही, माफी मागितल्यावर किम जोंगच्या डोळ्यात अश्रू देखील पाहायला मिळाले. त्यांनी जनतेची माफी मागितल्यानंतर आपल्या डोळ्यातील अश्रू पुसल्याचं पाहायला मिळालं आहे.

रिपोर्टनुसार, किम जोंग कोरियाच्या वर्कर्स पार्टीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना भावूक झाले. किम जोंग उनने म्हटलं की, मी उत्तर कोरियाच्या जनतेच्या अपेक्षांप्रमाणे काम करु शकलो नाही आणि त्यासाठी मी माफी मागतो. किम जोंगने भाषण सुरु असतानाच आपला चष्मा काढून डोळे पुसले. किम जोंगने आपल्या पूर्वजांची आठवण काढत सांगितले, “किम 2 संग आणि किम जोग इल यांचा महान उद्देश पूर्ण करण्यासाठी या देशाच्या जनतेने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. मात्र, माझे प्रयत्न आणि गांभीर्य लोकांच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी पुरेसे नाही. याचं मला खूप वाईट वाटतं.”

आपल्या भावनिक भाषणात किम जोंगने कोरोनाच्या साथीरोगामुळे सुरु असलेल्या आव्हानात्मक स्थितीचाही उल्लेख केला. तसेच दक्षिण कोरियासोबतचे संबंध सुधारण्याबाबतही किम जोंगने भाष्य केलं. या भाषणात किम जोंगने अमेरिकेवर थेट टीका केली नाही. विशेष म्हणजे उत्तर कोरियाच्या सत्तारुढ पक्षाचा 75 वा वर्धापन दिन साजरा होत असतानाच अमेरिकेच्या निवडणुकीला केवळ 4 आठवडे बाकी आहेत.

अण्वस्त्र कार्यक्रम देशाचं हत्यार

किम जोंगने देशातील जनतेला कोरोना काळाचा कठोरपणे सामना करण्याचं आवाहन केलं. तसेच उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध करत अमेरिकेने लादलेले निर्बंधांचाही न डगमगता ठामपणे सामना करा, असंही आवाहन केलं. उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम हा स्वसंरक्षणासाठी असल्याचं सांगताना किम जोंगने हे आपलं हत्यार असल्याचं सांगितलं.

संबंधित बातम्या :

डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ

किम जोंगच्या निशाण्यावर तीन देश, रासायनिक शस्त्रांची कुंडली समोर

Kim Jong-Un | उत्तर कोरियाच्या सुल्तानचा मास्क सक्तीचा फर्मान, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट सक्तमजुरी

North Korea dictator kim jong Un cry before people for failure in COVID period

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.