AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ

दोन छोट्या देशांच्या हुकुमशाहांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकीनऊ आणले आहे. (North Korea and Venezuela against America)

डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ
| Updated on: Sep 18, 2020 | 11:54 PM
Share

नवी दिल्ली : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला अनेक मोठ-मोठे देश घाबरतात. चीनसारखा देशही बोलत असला, तरी अमेरिकेवर हल्ल्याची हिंमत करत नाही. पण, दोन छोट्या देशांच्या हुकुमशाहांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकीनऊ आणले आहे. व्हेनेझुएलाचा हुकुमशाह निकोलस मादुरो आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग यांच्या कृत्यांनी अमेरिकेची डोकेदुखी वाढवली आहे. (North Korea and Venezuela against America)

किम जोंग आणि निकोलस मादुरो हे अमेरिकेचे दोन शत्रू, त्यांच्या उंचीपेक्षा जास्त उंच उडी मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या या दोघांचे देश म्हणजे उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. पण, अमेरिकेसमोर न झुकण्याचा त्यांचा अडेलपणा मात्र कायम आहे. यावेळी तर या दोघांनी डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका दिला आहे.

व्हेनेझुएलाच्या माध्यमांमध्ये सध्या एका फोटोची चर्चा आहे. 15 सप्टेंबरला अमेरिकेचे विमान पाडल्याचा दावा व्हेनेझुएला करतो आहे. या विमानात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज होते, असा आरोप व्हेनेझुएलाच्या लष्करानं केला आहे. 15 सप्टेंबरला दुपारी हे विमान व्हेनेझुएलाच्या हद्दीत घुसलं आणि ते त्यांच्या S-300 एअर डिफेंन्स सिस्टमनं ते पकडलं. त्यानंतर व्हेनेझुएलाच्या लष्कराच्या प्रत्युत्तरात अमेरिकेचं विमान पाडण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे.

व्हेनेझुएलात ड्रग्ज व्यापाराची समस्या सर्वात मोठी आहे. अमेरिकेचं विमान कोलंबियातून व्हेनेझुएलात कोकेनचा साठा आणत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याआधीही 8 जुलैला व्हेनेझुएलानं अमेरिकेच्या एका विमानाला लक्ष्य केलं होतं. अमेरिकेनं सध्या या बातम्यांची पुष्टी केलेली नाही. पण, व्हेनेझुएलाचा दावा जर खरा असेल, तर ही चूक व्हाईट हाऊसच्याही अंगलट येण्याची शक्यता आहे.

ड्रॅगनचा मित्र आणि अमेरिकेचा जन्मजात शत्रु किम जोंगही अमेरिकाविरोधी कारवाईत व्यस्त आहे. किम जोंग सध्या असं एक कारस्थान रचतो आहे. ज्यामुळे पँटागॉनसमोर मोठी अडचण उभी राहणार आहे. उत्तर कोरिया लवकरच समुद्रात बॅलेस्टिक मिसाईलचं परीक्षण करणार आहे.

अमेरिकेव्यतिरिक्त जपान आणि दक्षिण कोरियाचं लक्षही किम जोंगच्या या ड्रिम प्रोजक्टकडे लागलं आहे. उत्तर कोरियाच्या उत्तरपूर्व भागातील शिंपो शिपयार्ड इथे किम जोंगचे वैज्ञानिक त्याचं हे स्वप्न साकार करण्यासाठी दिवस-रात्र राबतात. मागील अनेक वर्षांपासून उत्तर कोरिया पाणबुड्यांमधून बॅलेस्टिक मिसाईल डागण्याची क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न करते आहे. जर उत्तर कोरियाकडे ही क्षमता आली, तर सुपरपॉवर अमेरिकेच्या अडचणीही वाढणार आहेत.(North Korea and Venezuela against America)

संबंधित बातम्या : 

संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताची पुन्हा चीनला धोबीपछाड, महिलांविषयक आयोगाचे सदस्यपद

डोनाल्ड ट्रम्प आक्रमक, अमेरिकन सैन्याच्या हालचालींनी चिनी समुद्रात खळबळ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.