Afghanistan Crisis: भारताकडून NSA स्तरावरील बैठक, चीनने सहभागी होण्यास दिला नकार; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने एनएसए स्तरावरील (NSA level meeting for regarding Afghanistan crisis) बैठक आयोजित केली आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या शेजारी राष्ट्रांसह रुस आणि मध्य आशियाई देश सहभागी होणार आहेत.

Afghanistan Crisis: भारताकडून NSA स्तरावरील बैठक, चीनने सहभागी होण्यास दिला नकार; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने एनएसए स्तरावरील (NSA level meeting for regarding Afghanistan crisis) बैठक आयोजित केली आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या शेजारी राष्ट्रांसह रुस आणि मध्य आशियाई देश सहभागी होणार आहेत. भारतसह एकूण आठ देश या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि सीमेपलीकडील दहशतवादावर यातर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय या बैठकीत सहभागी युद्धग्रस्त देशातील वाढती कट्टरता NSA (National security advisory) यावरही चर्चा करणार आहे. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले वाढले आहेत.  (NSA level meeting organised by India for Aghanistan taliban criris China will not participate)

चीन उपस्थित राहणार नाही

मध्य आशियाई देश अंमली पदार्थांचे उत्पादन आणि तस्करीबाबत खूप चिंतेत आहेत. तर अफगाणिस्तानात सोडून दिलेले शस्त्रं मोठा धोका ठरू शकतात अशी भीती या देशांना आहे, असं सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चीनला निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र, चीन या बैठकीला उपस्थित राहणार नाहीये. सूत्रांनी सांगितले की, वेळापत्रकातील अडचणींमुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे चीनने सांगितले. चीनच्या याआधी NSA ने आयोजित केलेल्या बैठकींमध्ये भाग घेतला आहे, जिथे पाकिस्तान नव्हता. 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे दिल्लीत NSA च्या बैठकीत न येण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणते देश साभागी असतील

सात देशांच्या NSA ने 10 नोव्हेंबर 2021 रोजी ‘दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग ऑन अफगाणिस्तान’ मध्ये त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. या देशांमध्ये इराण, रशिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित देशांच्या असलेल्या NSA शी भेट घेणार आहेत. भारतासह या आठपैकी कोणताही देशांनी तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाहीये.

Other News

Covid Vaccine: 2-18 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin च्या मंजुरीसाठी DCGI कडून वेळ लागण्याची शक्यता

Tripura Voilence: ट्विट केलं म्हणून पत्रकारावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केल्याबद्दल इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सचा निषेद


Published On - 10:49 pm, Mon, 8 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI