भारताच्या निर्णयाने जगात भूकंप, तेलांचे भाव वाढण्यास थेट सुरूवात, ट्रम्प यांच्या दाव्याने जगाची उडाली झोप

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर एकच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर तेल कंपन्यांची झोप उडाल्याचेही बघायला मिळत आहे. हा जगाला हादरा देणारा भारताचा निर्णय असणार आहे.

भारताच्या निर्णयाने जगात भूकंप, तेलांचे भाव वाढण्यास थेट सुरूवात, ट्रम्प यांच्या दाव्याने जगाची उडाली झोप
India oil
| Updated on: Oct 16, 2025 | 8:30 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच हैराण करणारा दावा केला. ज्यानंतर जगात एकच खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर अचानक तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठा दावा करत म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, तसे मला अत्यंत खात्रीशीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. भारताने खरोखरच हे अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे. रशियाच्या तेल आयातीवर नरेंद्र मोदी हे देखील चिंतेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानानंतर अनेकांचे दाबे दणाणले आहेत. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर अर्ध्या जगावर मोठे संकट येईल आणि तेलाच्या भाव गगणाला जाणार हे स्पष्ट आहे. भारताने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. भारत नेमकी काय भूमिका जाहीर करतो, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत.

जर खरोखरच भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर जग संकटात येईल हे स्पष्ट आहे. यादरम्यानच आता ब्रिटनच्या तेल उत्पादक कंपन्यांनी चीनच्या दोन तेल कंपन्यांवर आणि भारतीय रिफायनरी नायरा एनर्जीवर निर्बंध लादले आहेत. रशियाकडून भारत आणि चीन तेल खरेदी करत असल्याने हे निर्बंध लावण्यात आली. या महिन्यात भारताने रशियाकडून कमी प्रमाणात तेल खरेदी केले आहे. अमेरिकेचा वाढता दबाव याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका चीनसोबतच्या व्यापार युद्धात फसला आहे. भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर चीनवरही मोठा टॅरिफ लावला आहे. मात्र, चीन अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरला असून अमेरिकेवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत चीन आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे सांगितल्यानंतर भूकंप आला.

थेट तेलाच्या किंमतीमध्येही वाढ होईल. भारत रशियाकडून तेल खरेदी करून मोठा नफा कमावत असल्याचा आरोप अमेरिकेकडून यापूर्वी अनेकदा करण्यात आला. भारत खरोखरच तेल खरेदी बंद करणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिल्लीहून या विधानावर लवकरच भाष्य केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि नरेंद्र मोदी यांची चीनमध्ये भेट झाली.