AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Rising Lion : इराणच्या टॉप कमांडर्सना आधी एकत्र आणलं आणि नंतर सगळ्यांनाच एकत्र मारलं, वाचा थक्क करणारा प्लान

Operation Rising Lion : इस्रायलच्या ऑपरेशन रायजिंग लायन दरम्यान एक मोठी बाब समोर आली आहे. इस्रायलने इराणचे अणूप्रकल्प, सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलच. पण इराणच्या टॉप कमांडर्सचा एकाचवेळी कसं संपवलं? त्याचं प्लानिंग हैराण करुन सोडणार आहे. इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिलीय.

Operation Rising Lion : इराणच्या टॉप कमांडर्सना आधी एकत्र आणलं आणि नंतर सगळ्यांनाच एकत्र मारलं, वाचा थक्क करणारा प्लान
iran and israel war news
| Updated on: Jun 14, 2025 | 2:37 PM
Share

इस्रायलने इराणविरोधात ऑपरेशन रायजिंग लायन सुरु केलं आहे. या मिशनच्या पहिल्याच टप्प्यात इस्रायलने इराणमधील अण्विक प्रकल्प आणि सैन्य ठिकाणं उडवली. इस्रायलने हे ऑपरेशन एकरात्रीत किंवा काही दिवसात प्लान केलेलं नाही. कित्येक वर्षापासून या ऑपेरशनची ते तयारी करत होते. महत्त्वाच म्हणजे इस्रायलने फक्त बाहेरुन हल्ला केला नाही, तर इराणमध्येच हल्ल्यासाठी सिक्रेट बेस बनवले होते. हे सर्व मोसाद शिवाय शक्य नाही. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संस्था आहे. जगातील टॉप सिक्रेट गुप्तचर यंत्रणांमध्ये मोसादचा समावेश होते. मोसादने आतापर्यंत अनेक थक्क करुन सोडणारे ऑपरेशन्स केले आहेत. ऑपरेशन रायजिंग लायन अंतर्गत इराणवर झालेला हल्ला सुद्धा मोसादच तितकच मोठ यश आहे. अत्यंच अचूकतेने निवडलेल्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात इराण रेवोल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसैनी सलामी, आर्मी चीफ मोहम्मद बाघेरी, इमर्जन्सी कमांड हेड गुलाम अली राशीद, एअरफोर्स चीफ आमिर अली हाजीजेदह यांचा मृत्यू झाला. एकाचवेळी इतक्या टॉप लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा करण ही खूप मोठी बाब आहे. महत्त्वाच म्हणजे हे सर्व अधिकारी एकत्र कसे आले? त्यामागची प्लानिंग सुद्धा तितकीच खतरनाक होती. एका इस्रायली अधिकाऱ्याने फॉक्स न्यूजला नाव न छापण्याच्या अटीवर इराणी कमांडर्सनीा एकत्र आणण्यासाठी कसं जाळं विणलं त्याची माहिती दिली. या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र आणणं हा इस्रायलच्या प्लानचा भाग होता.

जे ठरवलं, त्यापेक्षा जास्त मोठ यश

“या लष्करी अधिकाऱ्यांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही काही विशिष्ट गोष्टी केल्या. त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी आम्ही त्या माहितीचा वापर केला. आम्ही अशा काही गोष्टी केल्या, आम्हाला माहित होतं ते भेटणार. पण यापेक्षा जास्त महत्त्वाच हे आहे की, त्यांना तिथे कसं ठेवायचं हे आम्हाला माहित होतं” असं इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं. इस्रायलने इराणमधील अण्विक तळ, सैन्य ठिकाणं आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांना संपवलं. इस्रायलच्या दृष्टीने जे ठरवलं, त्यापेक्षा जास्त मोठ यश त्यांना मिळालं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.