
ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने खोट्या गोष्टी पसरवण्यास सुरुवात केली आहे. खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन मिलट्री एक्सपर्ट टॉम कूपर आणि अमेरिकेचे युद्ध तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांनी पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारचा बुरखा फाडला आहे. या दोन्ही मिलिट्री तज्ज्ञांनी गेल्या तीन चार दिवस चाललेल्या लढाईत भारताचाच विजय झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी भारताला केविलवाणेपणे साकडं घातलं. त्यात काही नवीन नव्हतं. कारण पाकिस्तानचं एवढं नुकसान झालं होतं की त्यामुळे पाकिस्तान घाबरला होता. त्यामुळेच शस्त्रसंधी करण्याशिवाय पाककडे पर्याय उरला नव्हता, असं या दोन्ही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. टॉम कूपर हे जगातील सर्वात सन्मानिय युद्ध विशेषज्ञ आहेत. युद्ध इतिहासकार आहेत. कूपर हे विश्लेषक, लेखक आणि मध्यपूर्व पासून ते दक्षिण आशियापर्यंतच्या एअर वॉरचे एक्सपर्ट आहेत. 6 आणि 7 मे दरम्यान रात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताने भारताच्या अनेक सैन्य ठिकाण्यांवर...