
Pakistan ISI terror Plan: 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर बेछुट गोळीबार केला. बैसरन घाटीतील या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, हिंदू असल्याची खात्री करून पुरुषांवर गोळीबार करण्यात आला. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यात लाल किल्ल्याजवळ एका काश्मीरी डॉक्टरने आत्मघाती हल्ला केला. त्यात जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण जायबंदी झाले. सुरक्षा यंत्रणांच्या ताज्या अपडेटनुसार नवीन वर्षात पुन्हा एकदा देशात मोठा घातपात घडवण्याचा पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI चा डाव आहे. त्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या घनदाट जंगलात जवळपास 150 पाकिस्तानी दहशतवादी दडलेले आहेत. हिंदूंवर हल्ला करण्याचा कट त्यांनी रचला आहे.
घनदाट जंगलात परदेशी दहशतवादी
ET च्या एका वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील घनदाट जंगलात पाकिस्तान समर्थित दहशतवादी लपल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयीच्या कटाची माहिती दिली. त्यानुसार, काश्मीरभागात कितीही चोख सुरक्षा व्यवस्था असली तरी दहशतवादी धुकं, दाट जंगलाचा फायदा घेत, छुप्या मार्गाने प्रवेश करण्याचा मोठा धोका आहे. स्थानिकांनी आता दहशतवादाचा मार्ग जवळपास सोडला आहे. रस्त्यावरील प्रदर्शन, आंदोलन बंद झाले आहे. दगडफेक बंद झाली आहे. पण उंच डोंगर, दाट झाडी, धुकं याचा फायदा घेत हे दहशतवादी छुप्या मार्गाने काश्मीरमध्ये दाखल होतात. त्यांना काश्मीरी भाषा येत असल्याने त्यांची ओळख पटवणे जिकरीचे ठरते.
स्थानिक तरुणांची भरती शुन्यावर
जम्मू काश्मीरमधील तरूण गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारावायांपासून फटकून वागत असल्याचे समोर येत आहे. दगडफेक, आंदोलनाऐवजी हे तरुण क्रीडा, उद्योग आणि पर्यटन व्यवसायाकडे वळल्याचे दिसते. स्थानिक तरुणांची दहशतवादी प्रशिक्षणासाठी जाण्याची संख्या रोडावली आहे. हे प्रमाण अगदी शुन्यापर्यंत कमी झाल्याचे समोर आले आहे. पण पाकिस्तानातून भारतात 150 दहशतवादी दाखल झाल्याची भीती आहे. त्यातील 70 हे काश्मीरमध्ये सक्रीय असल्याचे समजते. तर उर्वरीत जम्मूमध्ये लपून बसलेले आहेत. कुपवाडा परिसरात काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्यात चकमक उडाली होती.
पाकिस्तानचा काश्मिरींवरील विश्वास कमी
सर्वात विशेष बाब म्हणजे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांचा काश्मिरींवरील विश्वास कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी चकमकी उडाल्या. स्थानिकांनी इनपूट दिल्याने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता चाल बदलली आहे. त्यांनी त्यांची माणसं काश्मीरमध्ये पेरली आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय देण्यात येतो. हे दहशतवादी आता हिंदूना टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याचे इनपूट्स सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत.