Operation Sindoor नंतर आता वर्षभराने अखेर पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून F-16 बद्दलच्या मोठ्या सत्याचा स्वीकार, भारताची ताकद मान्य

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्या वर्षभरानंतर आता पाकिस्तानी एअरफोर्सच्या माजी अधिकाऱ्याने एक कबुली दिली आहे. त्यातून चार दिवसांच्या सैन्य संघर्षात पाकिस्तानात त्यावेळी काय स्थिती होती ते आता समोर आलय. ऑपरेशन सिंदूरची ताकद यातून अधोरेखित होते.

Operation Sindoor नंतर आता वर्षभराने अखेर पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून F-16 बद्दलच्या मोठ्या सत्याचा स्वीकार, भारताची ताकद मान्य
IND VS PAK
| Updated on: Aug 14, 2026 | 10:06 AM

ऑपरेशन सिंदूरला वर्ष लोटल्यानंतर आता महत्वाची माहिती समोर आली आहे. खुद्द पाकिस्तानी एअर फोर्सच्या माजी अधिकाऱ्याने ही कबुली दिली आहे. ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर चार दिवस जो सैन्य संघर्ष चालला, त्यात पाकिस्तानी सैन्य दलांची काय स्थिती झालेली, ते वास्तव समोर आलय. एअर कमोडोर खालिद चिश्ती हे पाकिस्तानी एअरफोर्समधील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी एका मुलाखतीत काही आतल्या गोष्टी सांगितल्या. मे 2025 मध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी राफेल फायटर जेट्सची इतकी दहशत होती की, पाकिस्तानी एअर फोर्सवर आपली F-16 फायटर जेट्स लपवून ठेवण्याची वेळ आलेली. राफेल हे ज्या प्रमाणे भारताचं अत्याधुनिक फायटर जेट आहे, तसचं F-16 हे पाकिस्तानचं टॉप फायटर विमान आहे. पण भारताच्या कारवाईचा वेग असा होता की, पाकिस्तानला हे विमानच लपवून ठेवावं लागलं. आता वर्षभरातून ही वस्तूस्थिती समोर आलीय.

F-16 मध्ये BVR मिसाइल्सची कमतरता असल्याकडे कमोडोर खालिद चिश्ती यांनी लक्ष वेधलं. BVR मिसाइल्स म्हणजे नजरेपलीकडे जाऊन लक्ष्यभेद करण्याची क्षमता. F-16 मध्ये 70-100 किलोमीटर रेंजची मिसाइल्स आहेत. त्यातुलनेत इंडियन एअर फोर्सच्या राफेल जेटमध्ये बसवलेल्या मेटियोर मिसाइलची रेंज 150 किलोमीटरपेक्षा पण जास्त आहे. त्यामुळे राफेलच्या रेंजमध्ये आल्यानंतर शत्रुच्या फायटर जेटचा शेवट निश्चित आहे. त्यामुळेच पाकिस्तानला आपली F-16 लपवून ठेवावी लागली. पाकिस्तानी एअर फोर्सची सर्वाधिक भिस्त F-16 फायटर जेटवरच आहे. पण आता त्यांच्याच एअरफोर्सच्या सिनियर अधिकाऱ्याने F-16 ची पोलखोल केली आहे. चिश्ती यांनी जाहीरपणे ही गोष्ट मान्य केली की, F-16 विमानांमधील AIM-120 AMRAAM मिसाइलची रेंज राफेलमध्ये असलेल्या मेटियोरपेक्षा कमी आहे.

आतपर्यंत घुसून 9 दहशतवादी तळ नष्ट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं. 7 मे 2025 रोजी या ऑपरेशनची सुरुवात झाली. भारताने POK आणि पाकिस्तानच्या आतपर्यंत घुसून 9 दहशतवादी तळ नष्ट केले. यात जैश-ए-मोहम्मदचा बहावलपूरचा बालेकिल्ला आणि लश्कर-ए-तैयबाच मुख्यालय मुरीदके सुद्धा होतं. मुजफ्फराबाद आणि कोटली येथील लॉन्चपॅड्स सुद्धा नष्ट केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us