भारताला ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या भेटीत मोठा गेम, थेट..
US China Trade War : चीन आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा व्यापार संघर्ष सुरू आहे. त्यातच चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग अमेरिकेच्या दाैऱ्यावर होते. अखेर दोन्ही देशात मोठा करार झाला. मात्र, यामुळे भारताचे टेन्शन वाढले.

जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था चीन आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा प्रचंड वाढली. त्यातच चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर गेले. या दाैऱ्याकडे भारताची बारीक नजर होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या संसदेत रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशावर मोठा टॅरिफ लावण्याचा विधेयक मंजूर करण्यात आला. या विधेयकानुसार, भारत, चीन या देशांवर रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 100 टक्के टॅरिफ लागणार आहे. मात्र, आता भारताचे टेन्शन वाढले आहे. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेनंतर दोन्ही देशांनी 60 अब्ज डॉलर्सच्या व्यापारावरील आयात शुल्क कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार प्रत्येक देश दुसऱ्या देशाकडून येणाऱ्या 30 अब्ज डॉलर्सच्या असंवेदनशील वस्तूंवर आयात शुल्कात सवलत देणार आहे. हा एक अत्यंत मोठा निर्णय आहे. मात्र, एकीकडे अमेरिकेला चीनला सवलत देत आहे तर दुसरीकडे भारताबद्दल कठोर भूमिका घेत आहे. जरी हा टॅरिफचा विधेयक अमेरिकेतच्या संसदेत मंजूर झाला असलातरीही शेवटचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टातच असणार आहे.
हा निर्णय अशावेळी घेण्यात आला, ज्यावेळी दोन्ही देशातील व्यापारात सतत तणाव वाढत आहे. जागतिक संघर्ष निर्माण झाला. अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेवर चीन देखील आक्रमक भूमिका घेताना दिसला. ज्यानंतर अमेरिकेने माघार घेतल्याचे दिसतंय. चायना प्लस वन धोरणांतर्गत भारताकडे पर्यायी स्रोत म्हणून वळणाऱ्या जागतिक कंपन्या आणि अमेरिकन खरेदीदार आता अमेरिका-चीन व्यापार संबंध सामान्य झाल्यावर पुन्हा चीनकडे वळू शकतात.
यामुळे हा थेट भारताला मोठा फटका असणार आहे. भारतीय उत्पादन आणि निर्यातीचा वेग यामुळए मंदावू शकतो. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारविषयक तणाव कमी झाल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चितता कमी होईल. याचा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होण्याची शक्यता तशी कमी आहे. ज्यावेळी अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला, त्यावेळी चीनने याचा विरोध केला आणि अमेरिकेविरोधात भूमिका घेतली.
