Petrol-Diesel Price: ट्रम्प यांनी शांतता करार फेटाळला, पेट्रोल-डिझेल महागणार? आजची किंमत जाणून घ्या
Petrol Diesel Rates Today: डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार फेटाळल्याने जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींनी उकळी फुटली आहे. आखाती देशात यामुळे युद्ध भडकण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत आज भडकणार का? काय आहे आजची किंमत, जाणून घ्या.

Petrol Diesel Rates Today: जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींना उकळी फुटली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार फेटाळल्याने जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वधारल्या आहेत. मध्य-पूर्वेत युद्ध सुरू राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. डिझेलने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. बीबीसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जागतिक बाजारात डिझेल 199.33 पेन्स प्रति लिटरने भडकले आहेत. भारतीय चलनात ही किंमत अंदाजे 253.13 रुपये प्रति लिटर इतकी होते. तर पेट्रोलची किंमत वधारली आहे. सध्या पेट्रोल 174.23 पेन्स इतकी आहे. भारतीय चलनात ही किंमत 222 रुपये प्रति लिटर इतके आहेत. या घडामोडींचा जागतिक बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती आणि परकीय चलनाच्या दरानुसार देशातंर्गत बाजारात इंधनाचे दर ठरवले जातात. आज देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलची काय आहे किंमत?
प्रमुख शहरांतील आजेच दर
देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसत नसली तर आगामी काळात सरकारवर जागतिक किंमतीचा दबाव वाढला तर मोठा फरक जाणवू शकतो. या किंमतीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये स्थानिक कर (VAT) आणि इतर शुल्क लागत असल्याने किंमतीत फरक दिसू शकतो. इंधनाचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढलेले नसल्याने मालवाहतूक आणि खासगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आजची पेट्रोल आणि डिझेलची किंमत काय?
goodreturns नुसार आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलची किंमत अपडेट झाली. त्यानुसार,
शहर पेट्रोल डिझेल
नवी दिल्ली 102.12 रुपये 95.20 रुपये
कोलकत्ता 113.51 रुपये 99.82 रुपये
मुंबई 111.21 रुपये 97.83 रुपये
चेन्नई 107.11 रुपये 99.55 रुपये
पुणे 112.02 रुपये 98.66 रुपये
नाशिक 112.44 रुपये 99.05 रुपये
किंमती एका SMS वर
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.
