अखेर अक्कल ठिकाण्यावर… दिल्लीसमोर आम्ही पानीकमच; पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याची कबुली
पाकिस्तानच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने अखेर भारताच्या वाढत्या सैन्य सामर्थ्याची कबुली दिली आहे. दिल्लीच्या वाढत्या संरक्षण क्षमतेसमोर पाकिस्तान स्पर्धा करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या हवाई, क्षेपणास्त्र आणि पारंपारिक हल्ल्यांच्या वाढत्या क्षमतेचा पाकिस्तान सन्मान करतो आणि त्यातून त्यांना धोका वाटतो, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

भारत आणि पाकिस्तानमधील विस्तव काही केल्या जात नाहीये. फाळणीनंतर दोन्ही देशांमधील दुश्मनी अधिकच वाढली. या काळात दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्धही झाले. आजच्या स्थितीत दोन्ही देशांमध्ये कोणतेही राजकीय संबंध नाहीत. ऑपरेशन सिंदूरनंतर तर हे संबंध अधिकच बिघडलेले आहेत. असं असलं तरी पाकिस्तानला अखेर दिल्लीची ताकद मानावी लागली आहे. पाकिस्तानच्या सैन्याच्या प्रवक्त्याने भारताच्या वाढत्या सैन्य क्षमतेचा स्वीकार केला आहे. इस्लामाबाद दिल्लीच्या समोर कोणत्याच स्पर्धेत नसल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.
अल अरबिया इंग्लिश या वृत्तसंस्थेला पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी ही कबुली दिली आहे. भारताच्या हवाई, मिसाईल आणि पारंपारिक हल्ल्याच्या क्षमतेत वाढ होत आहे. त्यामुळे पाकिस्तान किती चिंतेत आहे? असा सवाल अहमद शरीफ चौधरी यांना विचारण्यात आला. त्यावर, पाकिस्तान भारताच्या सैन्य क्षमतेचा पूर्ण सन्मान करतो. आणि आपलं शस्त्रास्त्र कोठार वाढवण्याच्या दिल्लीच्या प्रयत्नांनाही समजू शकतो, असं अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटलं आहे.
आम्ही भारताचा सन्मान करतो
पाकिस्तानही आपल्या संरक्षण क्षमतेवर लक्ष केंद्रीत करून आहे. याचा अर्थ कोणत्याही देशाच्या विरोधात आक्रमक होण्याचा आमचा इरादा नाहीये. आम्ही भारतीय सैन्य क्षमतेचा संपूर्ण सन्मान करतो. भारताकडून सैन्य शस्त्रागार आणि सैन्य क्षमता वाढवण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. संसाधनावर खर्च वाढवला जात आहे. भारताची ही बाजू आम्ही समजू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की, भारताच्या शस्त्र साठ्याच्या स्पर्धेत पाकिस्तान उतरलाय, असं चौधरी म्हणाले.
भारताने स्वदेशी संरक्षण निर्मितीवर अधिक भर दिलेला आहे. तसेच अॅडव्हान्स्ड मिलिट्री प्लॅटफॉर्म निर्मितीवरही भारत काम करत आहे, अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याने भारतासमोर पाकिस्तान काहीच नसल्याची कबुली दिल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
मिसाइल आणि एअर डिफेन्स वाढवले
गेल्या वर्षी पाकिस्तानच्या विरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. त्यानंतर भारताने आपली सैन्य क्षमता वाढवण्यास सुरुवात केली. मार्च 2025मध्ये भारताने 1,460 कोटी रुपयांच्या नवदुर्गा डिफेन्स टेस्टिंग रेंजचा शिलान्यास केला. जर यंदा जुलै 2026मध्ये प्रोजेक्ट कुशा अंतर्गत भारताने फ्लाइट टेस्ट केली. या फ्लाइट टेस्टची क्षमता 400 किलोमीटर दूरपर्यंत जाण्याची आहे.
अग्नि सीरीज आणि….
गेल्या महिन्यात सरकारने पारंपारिक मिसाइल प्रणालींसाठी DRDO टेक्नोलॉजींना भारताने कंपन्यांच्या हस्तांतराला मंजुरीही दिली. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये अशा प्रणालींच्या विकास आणि उत्पादनात मोठी भूमिका मिळाली आहे.