AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Devendra Fadnavis : ‘तुमसे ना हो पायेगा’ या आंदोलनावरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मनाला लागेल असं सुनावलं

CM Devendra Fadnavis : आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे मराठवाड्यात येणार आहेत. मराठवाड्यातील प्रश्नांवर, समस्यांवर ते आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी 'तुमसे ना हो पायेगा' नाव दिलं आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

CM Devendra Fadnavis : 'तुमसे ना हो पायेगा' या आंदोलनावरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मनाला लागेल असं सुनावलं
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
| Updated on: Sep 17, 2026 | 11:46 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासाठी आज मराठवाड्यात आले होते. “पावसाचा मोठा खंड पडल्याने मराठवाड्यासह इतर भागात पीकं धोक्यात आली आहेत. एनडीआरएफ कायद्यानुसार अधिकृत पंचनामे 5 ऑक्टोंबर नंतर करावे लागतील, तर ते ग्राह्य धरले जातील. पण तो पर्यंत आम्ही थांबलेलो नाही. त्वरित पंचनामे पूर्ण करुन दुष्काळाच्या उपायोजना सुरु करत आहोत. शेतकऱ्यांना थेट मदत करणं असेल. पिण्याच पाणी, जनावरांना चारा दुष्काळाच्या सर्व उपायोजना ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, तिथे करणार आहोत. राज्य सरकारने तयारी करुन ठेवली आहे. अडचणीची परिस्थिती असली, तरी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात आहेत. उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील प्रश्नांवर, समस्यांवर आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी ‘तुमसे ना हो पायेगा’ नाव दिलं आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. “हे नाकार्त्यांचं आंदोलन आहे. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलं नाही. संधी मिळाली तरी काही केलं नाही अशा नाकार्त्यांच हे आंदोलन आहे. आम्ही यापूर्वीही करुन दाखवलं आहे. आता यापुढेही करुन दाखवू. मराठवाड्याला जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करुन. ज्यावेळी आम्ही बोललेलो मराठवड्याला फ्लड मिटिगेशनच पाणी आणू. त्यावेळी आम्हाला मूर्खात काढलेलं. आम्ही ते करुन दाखवले. आम्ही त्याचं टेंडर काढलं, वर्ल्ड बँकेकडून मान्यता मिळवली. त्याचे पैसे देखील मिळाले” असं फडणवीस यांनी सांगितलं.

हे फक्त बोलघेवडे

“मराठवाड्याच्या इतिहासातलं मोठं असेल ते म्हणजे कोकणातलं पाणी या ठिकाणी आणायचं आहे. त्याचा डीपीआर करुन ठेवलेला आहे. डीएमआयसी कोणी केली, उद्योग कोणी आणले?. छत्रपती संभाजीनगर, जालना हे देशातलं ईव्हीचं मॅग्नेट झालय. हे कोणामुळे झालं? तुम्ही केवळ विरोध करत राहा. हे नाकार्त्यांच आंदोलन आहे. तुम्ही फक्त बोलत राहा हे बोलघेवडे आहेत” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Follow Us
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा