AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: मोदींची उंची हिमालया एवढी… थेट गुजरातमध्ये जात शिंदेंनी दिल्या मोदींना हटके शुभेच्छा!

Eknath Shinde: मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी देशभरातील दिग्गजांनी वडोदरामध्ये हजेरी लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वडोदरात उपस्थित आहेत.

Eknath Shinde: मोदींची उंची हिमालया एवढी... थेट गुजरातमध्ये जात शिंदेंनी दिल्या मोदींना हटके शुभेच्छा!
PM Modi and Eknath ShindeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 12:14 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुजरातच्या वडोदरा येथेही एका भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमासाठी देशभरातील दिग्गजांनी वडोदरामध्ये हजेरी लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वडोदरात उपस्थित आहेत. यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी वडोदराला जाणाऱ्या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे हे पहिले नेते आहेत. त्यांनी मोदींना अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने महाराष्ट्रातील प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मोदींच्या वाढदिवसाची जाहिरात दिली आहे. तसेच वडोदरामध्ये जाऊन मोदींच्या कार्याची महती देणारे भाषणही केलं आहे.

आजचा दिवस आनंदाचा

वडोदरामध्ये आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं खास भाषण झालं. यावेळी शिंदेंनी मोदींचे विविध पैलू उलगडवून दाखवले. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. वडोदराच्या प्रेरणादायी आणि पवित्र भूमीवर मला येण्याची संधी मिळाली. मी वडोदराच्या पवित्र धरतीला नमन करतो. मी महाराष्ट्राच्या वतीने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. साडेबारा कोटी जनता आणि शिवसेनेकडून आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी अभिष्टचिंतन करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मोदींच्या कार्याला उजाळा

संपूर्ण देशात मोदींचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जात आहे. एनडीएच्या बैठकीत आपले गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते की, यावेळचा त्यांचा जन्मदिवस कार्यक्रम आणि 25 वर्ष मोदीजींना CM आणि PM च्या रुपात आपण पाहिले आहे. हे मोठी गोष्ट आहे. हा खूप मोठा काळ आहे. आणि हा आपल्या देशाचा गौरव आहे. त्यामुळेच यंदाचा मोदींचा वाढदिवस आपल्याला मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा आहे. मोदींचं हे कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. आपल्या सर्व सरकारी योजना प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करायला हवे. याच उद्देशाने हा कार्यक्रम होत आहे. मी पुन्हा एकदा शिवसेनेकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून मोदीजींना खूप खूप शुभेच्छा देतो, असं शिंदे म्हणाले.

मोदींचं कर्तृत्व हिमालयाएवढं…

मोदीजींबाबत वयाचा आकडा कोणी मोजत नाही. आपण त्यांच्या कर्तृत्वाची उंची पाहातो. मोदींच्या कर्तृत्वाची थेट हिमालयाशी तुलना होते. जनतेच्या प्रती त्यांचे काम अरबी समुद्राच्या खोली पेक्षाही मोठं आहे. वडोदरामधील एका मुलाचा आवाज आज हा आज केवळ देशात नाही जगात गाजत आहे. ही आपल्यासाठी सौभ्याची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट