कतारचा एक निर्णय आणि पाकिस्तान-बांगलादेशची लागली वाट, थेट भारतावर…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. या युद्धाचा मोठा परिणाम आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर होताना दिसतोय. कतारने असा एक निर्णय घेतला ज्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशाची झोप उडाली.

कतारचा एक निर्णय आणि पाकिस्तान-बांगलादेशची लागली वाट, थेट भारतावर...
Pakistan and Bangladesh
| Updated on: Mar 06, 2026 | 10:13 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्त्रायल आणि इराणमधील लोकांचे मोठ्या प्रमाणात जीव गेले. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम सर्वच देशांवर होत आहे. इराणने कतारच्या कारखान्यांवर मोठे हल्ले केले. त्यानंतर कतारकडून असा एक निर्णय घेण्यात आला, ज्याने आशियाई पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक देशांची थेट झोप उडाली. त्यामध्येच सर्वात जास्त संकट पाकिस्तान आणि बांगलादेशावर आहे. कारण त्यांच्याकडे काहीच पर्याय नाहीत. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाची झळ थेट पाकिस्तानला अगोदरच बसली आहे. त्यामध्येच हा अत्यंत मोठा धक्का त्यांच्याकरिता नक्कीच म्हणावा लागेल. कारण इराणच्या समर्थनार्थ पाकिस्तामध्ये मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये थेट अमेरिकन दूतावासाला टार्गेट करण्यात आले. ज्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानातील व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर कतारने एलएनजी पुरवठा आणि उत्पादन पूर्णपणे थांबवले आहे. कतारच्या या निर्णयामुळे गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होणार हे स्पष्टच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात यामुळे ऊर्जेची मोठी समस्या निर्माण झाली. कारण हे दोन्ही देश कतारच्या ऊर्जेवर पूर्णपणे अवलंबून आहेत, त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नाहीये.

कतार आणि संयुक्त अरब अमिराती एकत्रितपणे पाकिस्तानच्या 99 टक्के एलएनजी आयात करते तर बांगलादेशला 72 टक्के भारताला 53 टक्के एलएनजी आयात केला जातो. यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशावर अत्यंत मोठे संकट आहे. त्यामध्येच आता एलएनजीचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.

मुळात म्हणजे पाकिस्तानकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. पूर्णपणे ते कतारवर अवलंबून आहेत. भारताकरिता ही मोठी समस्या नक्कीच नाही, कारण भारताकडे इतरही काही पर्याय आहेत. पण पाकिस्तान आणि बांगलादेश पूर्णपणे अडचणीत आल्याचे दिसत आहे. इराणने जरी कतारच्या प्रकल्पांवर हल्ला केला असला तरीही त्याचा सर्वात मोठा आणि जास्त फटका हा थेट बांगलादेश आणि पाकिस्तानला बसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us