AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचे सुखोई-30 उड्डाणानंतर काही वेळातच रडाराहून गायब, मोठी खळबळ, थेट दोन पायलट…

भारताचे वायुसेनेतील सर्वात महत्वाचे लढाऊ विमान सुखोई-30 आहे. मात्र, सुखोई-30 चा मोठा अपघात झाला. विमानाचा शोध सुरू असून दोन पायलटही बेपत्ता आहेत. बचावकार्य वायुसेनेकडून राबवले जात आहे.

भारताचे सुखोई-30 उड्डाणानंतर काही वेळातच रडाराहून गायब, मोठी खळबळ, थेट दोन पायलट...
Sukhoi-30
| Updated on: Mar 06, 2026 | 9:02 AM
Share

इराण आणि अमेरिकेत मोठे युद्ध सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर मोठे हल्ले करत आहे. यादरम्यान भारताने हे युद्ध थांबवण्याची भूमिका घेतली. या युद्धाचा थेट फटका भारतालाही बसताना दिसत आहे. भारतात तेलाचा तुटवडा निर्माण झाला. एलपीजी गॅसचीही मोठी समस्या आहे. पुढील 25 दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅस भारताकडे शिल्लक आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. अमेरिकेने भारतावरील निर्बंध सध्याच्या स्थितीला काढली आहेत. आता भारतीय हवाई दलातून एक अतिशय धक्कादायक बातमी पुढे येत आहे. गुरुवारी संध्याकाळी आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले. सुखोई-30 फाइटर जेट रडाराहून गायब झाले. या खुशोई लढाऊ विमानाचा शोध सुरू आहे. सुखोई हे विमान भारतीय वायुदलातील सर्वात महत्वाचे विमान असून ते अचानक अशाप्रकारे गायब झाल्याने खळबळ उडाली.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, लढाऊ विमानाबद्दल कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. विमानात दोन वैमानिक होते असे वृत्त आहे. सायंकाळी 7.42 ला विमानाचा रडार आणि ग्राऊंड कंटोलसोबत संपर्क तुटला. त्यानंतर लगेचच बचावकार्य राबवण्यात आले. कार्बीच्या 60 किलोमीटरवर विमानासोबत दुर्घटना झाली. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. मात्र, आतापर्यंत विमानाची माहिती मिळू शकली नाही.

संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी या घटनेवर बोलताना म्हटले की, भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय विमान बेपत्ता झाले आहे. या विमानाने आसाममधील जोरहाट विमानतळावरून उड्डाण केले आणि संध्याकाळी 7.42 ला त्याचा रडारशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर विमानाचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

सध्या बेपत्ता विमानाचा शोध सुरू आहे. सुखोई-30 उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील बोकाजान येथील काही रहिवाशांनी दावा केला की, विमान जंगलात कोसळले. त्यानंतर त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला. मात्र, अजूनही विमान किंवा पायलट मिळाले नाहीत. ज्या भागात विमान कोसळल्याचा दावा केला जात आहे, तिथे घनदाट जंगल आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...