पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा मोठा दावा, PAK मध्ये खरोखरच आहे सोन्याचा खजिना, म्हणाले, सर्व कर्ज…

पाकिस्तानमधील परिस्थिती अजिबातच बदलली नाहीये. कर्जाचा डोंगर हा सातत्याने वाढताना दिसतोय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा वादा केला आहे.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा मोठा दावा, PAK मध्ये खरोखरच आहे सोन्याचा खजिना, म्हणाले, सर्व कर्ज...
Pakistan
| Updated on: Aug 19, 2025 | 10:33 AM

पाकिस्तान मागील काही वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटात आहे. पाकिस्तानची पूर्ण अर्थव्यवस्था ढासळलीये.  IMF म्हणजेच विश्व बँकेने देखील त्यांना मदत केली. मात्र, असे असूनही पाकिस्तानमधील परिस्थिती अजिबातच बदलली नाहीये. कर्जाचा डोंगर हा सातत्याने वाढताना दिसतोय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर (Asim Munir) यांनी नुकताच म्हटले आहे की, आमच्यावरील सर्व कर्ज आम्ही फेडू आणि लवकरच आमचा देश जगातील टॉप देशांपैकी एक असेल. हेच नाही तर त्यांनी थेट म्हटले होते की, त्यांच्या देशामध्ये एक अत्यंत मोठा खजिना आहे.

बलूचिस्तान प्रांतमध्ये Reko Diq गोल्ड डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये मोठा खजिना आहे, याच डोंगरामुळे पाकिस्तानला चांगले दिवस येतील, असे आसिम मुनीर यांचे म्हणणे आहे. मुलाखतीत आसिम मुनीर यांनी सांगितले की, पाकिस्तान दुर्मिळ खनिजांच्या साठ्यावर अवलंबून आहे. आम्ही लवकरच सर्व कर्ज कमी करू आणि जगातील सर्वात समृद्ध देशांपैकी एक बनू. बलूचिस्तानमध्ये आमच्याकडे एक मोठा खजिना आहे.

ते म्हणाले की पुढील वर्षापासून आम्ही दरवर्षी किमान 2 अब्ज डॉलर्सचे उत्पादन त्यामधून सुरू करू. चीनने यामध्ये सहभाग घेतला तर आमचे सर्व कर्ज संपेल. मात्र, बलूचिस्तान प्रांताच्या डोंगरामध्ये मोठा खजिना आहे असे आसिम मुनीर यांना वाटते. तशी नोंद कुठेही नाहीये. मात्र, पाकिस्तानमध्ये असा कोणताही प्रकारचा खजिना नसल्याचे सांगितले जात आहे. आसिम मुनीर हे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या दाैऱ्यावर होते.

हेच नाही तर आसिम मुनीर यांनी थेट अमेरिकेच्या भूमीवरून भारताला धमकी दिली. भारत आणि अमेरिकत टॅरिफच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच आसिम मुनीर हे अमेरिकेत गेले आणि त्यांनी भारताला धमकी दिली. भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. भारताच्या शेजारी देशांवर अशा मोठा टॅरिफ अमेरिकेने लादला नाहीये. अमेरिका पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचे काम करत आहे. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफसाठी दबाव टाकला जात आहे.