
Asim Munir : पहलगाममधील दहशतवादी झाल्यानंतर पाकिस्तानचा असमी मुनीर हा लष्करी अधिकारी चांगलाच चर्चेत आला. या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने घेतलेल्या भूमिकेचीही जगभरात चर्चा झाली. तो पाकिस्तानी लष्करात जनरल या मोठ्या हुद्द्यावर आहे. असे असतानाच आता पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तान तसेच पाकिस्तानी लष्कराबाबत वेगवेगळे गंभीर आरोप केले जात असताना ससीम मुनीरला बढती मिळाली आहे.
पाकिस्तीन लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर आता थेट फील्ड मार्शल या पदावर जाऊन बसला आहे. त्याच्या या बढतीला पाकिस्तानी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयानेचे तसे अधिकृतपणे सांगितले आहे.
पाकिस्तानच्या लष्करात फील्ड मार्शल हे फार महत्त्वाचे आणि मोठे पद आहे. या पदाचा एक वेगळा मानसन्मान असतो. हे पद मिळणाऱ्याला फक्त लष्कराबाबतच नव्हे तर देशाच्या रणनीतीविषयक अधिकारांतही हस्तक्षेप करण्याचा अधिकार असतो. म्हणजेच आता असीम मुनीरला फक्त पाकच्या सेनाच नव्हे तर रणनीतीविषयक निर्णयांतही स्थान दिले जाणार आहे. पाकिस्तानी सरकारच्या या निर्णयामुळे असीम मुनीरची ताकद वाढली आहे.
असीम मुनीर यांनी 2022 साली पाकिस्तानी लष्करप्रमुखाची जबाबदारी सांभाळली. आता 2025 साली असीम मुनीरला फील्ड मार्शल पदावर बढती मिळाली आहे. असीम मुनीर पाकिस्तानचा 11 वा लष्करप्रमुख आहे. याआधी ते GHQ च्या मुख्यालयात जनरल पदावर काम करत होते. असीम मुनीरने 1986 साली सैन्यातील करिअरला सुरुवात केली. असीम मुनीर हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुखही राहिलेला आहे. असीम मुनीर याला सैन्यातील निशान-ए-इम्तियाज़, हिलाल-ए-इम्तियाज़ तसेच प्रतिष्ठित स्वॉर्ड ऑफ ऑनर असे महत्त्वाचे सन्मान मिळालेले आहेत.