AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan : कोळसा खाणीत भीषण स्फोट, 32 मजुरांचा मृत्यू, वेगाने मदतकार्य सुरू

pakistan news : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

Pakistan : कोळसा खाणीत भीषण स्फोट, 32 मजुरांचा मृत्यू, वेगाने मदतकार्य सुरू
| Updated on: Jul 31, 2026 | 7:27 AM
Share

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये गुरुवारी भीषण दुर्घटना घडली आहे. कोळसाखाणीत मोठा भाग कोसळल्याची माहिती हाती आली आहे. या दुर्घटनेत कमीत कमी 32 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर या दुर्घटनेत एक डझनहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाकडून दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांचाही शोध सुरू आहे.

बलुचिस्तानची राजधानी क्वेटाजवळील सुरांजच्या दुर्गम भागात हा भीषण स्फोट झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बलुचिस्तानचे (Balochistan) खाण आणि खनिज विकास मंत्री शोएब नौशेरवानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, ‘खाणीत स्फोट झाला, त्यावेळी विविध भागात मजूर काम करत होते’.

नौशेरवानी यांनी दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. तसेच घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख पाकिस्तानी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले आहेत. खाणीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्याचेही आदेश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचलं आहे. खाण विभागाचे मुख्य निरीक्षक मोहम्मद आतिफ यांनी सांगितलं की, खाणीत सुमारे 4000 फूट खोलीवर बचावकार्य सुरू आहे. खाण कामगारांच्या युनियनने या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेतली आहे.

या दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. पाकिस्तानी सेंट्रल मॉइन्स लेबर फेडरेशनने सरकारला सुरक्षा नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी खाण सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. दुर्घटनेनंतर खाणीतील विषारी वायुच्या धोक्यामुळे बचाव पथकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खाणीतील ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. या बेपत्ता खाण कामगारांना (Labour) सुरक्षितपणे बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेतील 32 जणांच्या मृत्यूने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी