AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने चीनच्या मदतीने तयार केले Fatah-3 सुपरसॉनिक मिसाईल, ब्रह्मोसला देणार उत्तर ?

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ब्रह्मोस मिसाईलने पाकिस्तानच्या अनेक भागात अतिरेकी तळ उद्धवस्त करण्यात आले होते. या ब्रह्मोसला आता उत्तर देण्यासाठी पाकने चीनच्या मदतीने Fatah-3 सुपरसॉनिक मिसाईल तयार केले आहे.

पाकिस्तानने चीनच्या मदतीने तयार केले Fatah-3 सुपरसॉनिक मिसाईल, ब्रह्मोसला देणार उत्तर ?
Fatah-3
| Updated on: May 08, 2026 | 4:24 PM
Share

पाकिस्तानने आता आपल्या नवीन सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल Fatah-3 ला सर्वांसमोर आणले आहे. हे क्षेपणास्र पाकिस्तानच्या फतह क्षेपणास्र फॅमिलीचा नवीन ताकदवान सदस्य आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे क्षेपणास्र भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्राला उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

फतह-3 च्या क्षमतेने पाकिस्तानच्या सैन्याची ताकद वाढणार आहे. खासकरुन समुद्र आणि जमीनीवर अचूक हल्ले करण्यासाठी हे क्षेपणास्र कामी येणार आहे. फतह – 3 चीनच्या HD-1 सुपरसॉनिक क्रूझ मिसाईलची पाकिस्तानी आवृत्ती आहे. ही एक रोड-मोबाईल मिसाईल आहे. म्हणजे याला ट्रकवर लावून एका जागेवरुन दुसरीकडे घेऊन जाता येते.

या मिसाईल सिस्टीममध्ये दोन मिसाईलवाले कंटेनर (Twin-Canister TEL) लावलेले असतात. म्हणजेच एका लाँचरने दोन मिसाईल एकसाथ डागता येऊ शकतात. पाकिस्तानने याला आपल्या जुन्या फतेह मालिकेत समाविष्ठ करुन आता सुपरसॉनिक मिसाईलची क्षमता मिळवली आहे.

फतह-3 ची खासियत काय आहे ?

फतह-3 मिसाईल 3704 ते 4939 किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकते. म्हणजे ध्वनीच्या गतीपेक्षा तीन ते चार पट वेगाने हे मिसाईल उडू शकते. याची मारक क्षमता 290 ते 450 किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. हे मिसाईल 240 ते 400 किलोग्रॅमपर्यंतचे वॉरहेड वाहून घेऊन जाऊ शकते.

हे मिसाईल समुद्राच्या पृष्ठभागावरुन खूप जवळून उडत लक्ष्यापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे शत्रूच्या रडावर या पकडणे कठीण जाते. हे क्षेपणास्र जमीनीवर अचूक हल्ले करण्यासाठी आणि शत्रूच्या जहाजांवर हल्ला करणे असा दोन्ही प्रकारच्या हल्ल्यांसाठी डिझाईन केले आहे. याची अचूकता आणि वेग खूप खतरनाक आहे.

भारतासाठी काय धोका ?

तज्ज्ञांच्या मते भारताच्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रुझ मिसाईलला हे उत्तर मानले जात आहे. ब्रह्मोस भारत आणि रशियान संयुक्तपणे तयार केले आहे आणि ते जगातील सर्वात वेगवान क्रुझ मिसाईल पैकी एक मानले जाते. पाकिस्तान Fatah-3 द्वारे ब्रह्मोसची क्षमता मॅच करण्याचा प्रयत्न करत आहे.

या मिसाईलमुळे पाकिस्तानला समुद्री लक्ष्य ( भारतीय नौदलाची जहाज )आणि जमीनीवर भारतीय ठिकाणांना टार्गेट करण्याची नवीन क्षमता मिळणार आहे. यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यानची मिसाईल तंत्रज्ञानाची स्पर्धा आणखीन वेगवान झाली आहे.

Fatah-3 ला सामील करुन पाकिस्तान आपल्या फतह मिसाईल सिरिजला आणखीन मजबूत करत आहे. आधी फतह सिरिजमध्ये बहुतांशी बॉलिस्टिक मिसाईल होते. परंतू आता सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल जोडून पाकिस्तानने आपल्या शस्रास्रांचा परिघ वाढवला आहे.हे मिसाईल रोड-मोबाईल असल्याने युद्धाच्यावेळी वापरणे आणि लपणे सोपे जाते. चीनच्या मदतीने हे क्षेपणास्रे विकसित करण्यात आल्याने हे पाकिस्तानी आणि चीन संरक्षण भागीदारीचे नवीने उदाहरण म्हटले जात आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!