Imran Khan | दिवस फिरले, इम्रान खानवर काय वेळ आली? आता तुरुंगात अंगावर पडलं मजूर काम

Imran Khan | इम्रान खान पाकिस्तानच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन होते. झुंजार क्रिकेटपटू असा त्यांचा लौकीक होता. आता राजकारणाच्या मैदानातही त्यांची अशीच झुंज सुरु आहे. त्याच इम्रान खान यांना एका प्रकरणात शिक्षा झालीय. त्यांच्यावर तुरुंगात काम करण्याची वेळ आलीय.

Imran Khan | दिवस फिरले, इम्रान खानवर काय वेळ आली? आता तुरुंगात अंगावर पडलं मजूर काम
Imran Khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 06, 2024 | 1:15 PM

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सिफर प्रकरणात 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यांना रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी हाय प्रोफाईल कैदी असूनही त्यांना जेलमध्ये लेबर वर्क कराव लागेल. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार 71 वर्षीय इम्रान आणि 67 वर्षांच्या कुरैशीना हाय प्रोफाइल कैदी म्हणून वेगवेगळ ठेवण्यात आलं आहे. इम्रान खान हे पाकिस्तानच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कुरैशी पक्षाचे उपाध्यक्ष आहेत.

रिपोर्टनुसार, दोघेही चांगल्या दर्जाच्या जेलमध्ये कैद्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधेचा लाभ उचलत आहेत. दोषी ठरवण्याआधी ज्या सुविधा मिळत होत्या, त्याच सर्व सुविधा आहेत. यात एक्सरसाइज मशीन सुद्धा आहे. दोघांना जेल मॅन्युअलनुसार, तुरुंगातील कपड्यांचे दोन सेट दिले आहेत. पीटीआय अध्यक्षांवर अन्य प्रकरणात खटले सुरु आहेत. म्हणून त्यांना तुरुंगातील कपडे अनिवार्य करण्यात आलेले नाहीत. लिखित आदेशानुसार तुरुंगाच्या परिसरात दोघांना कामही कराव लागणार आहे.

काय काम कराव लागेल?

पाकिस्तानात हाय-प्रोफाईल कैद्यांना जेलची फॅक्टरी, स्वयंपाकगृह, रुग्णालय, बगीचा आदि काम करणाऱ्या कैद्यांसोबत ठेवल जात नाही. त्यामुळे त्यांना देखभाल आणि जेल प्रशासनाकडून दिल जाणार काम कराव लागेल.

तो काळ सुद्धा शिक्षेत पकडणार

इम्रान आणि कुरैशी दोघेही स्वत:च जेवण स्वत: बनवू शकतात. जेल मॅन्युअल नुसार तयार जेवणही जेऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, इम्रान खान आणि कुरैशीला दोषी ठरवण्याआधी अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यामुळे तो काळ सुद्धा त्यांच्या शिक्षेमध्ये पकडला जाईल.