भारताच्या मित्राची अफगाणिस्तानला थेट साथ, पाकिस्तानचा थयथयाट, भारताप्रमाणेच..
Russia-Taliban Military Alliance : पाकिस्तान, चीन आणि अमेरिकाला मोठा दणका बसला. सर्वात मोठा झटका पाकिस्तानला बसला असून पाकिस्तानचा थयथयाट बघायला मिळत आहे. रशियाने एकाच दगडात तीन पक्षी मारल्याचे बघायला मिळत आहे. पाकिस्तानची तर झोपच उडालीये.

पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेची झोप उडवणारा निर्णय रशियाने घेतला. रशियाकडून एकाच दगडात तीन पक्षी मारण्यात आले. नेहमीप्रमाणेच पाकिस्तानने भारतावर बिनबुडाचे आरोप केले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तालिबानवर हल्ला केला. ते म्हणाले की, तालिबान पाकिस्तानविरोधात भारतासोबत मिळून काम करत आहे. दुसरीकडे रशियाने इतका मोठा धक्का पाकिस्तानला दिला की, पळता भुई कमी पडली. रशियाने अफगाणिस्तानला हाताला धरून मोठा डाव खेळला. ज्यामुळे चीन आणि अमेरिकेचेही टेन्शन वाढले. रशियाने तालिबानसोबत लष्करी सहकार्य वाढवण्याचा करार केला. अफगाणिस्तानने रशियाला मदत मागताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला. मॉस्को येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचामध्ये रशियाने अफगाणिस्तानसोबतच्या कराराला मंजुरी दिली. या कार्यक्रमात तालिबानचे संरक्षण मंत्री उपस्थित होते.
तालिबान सरकारला मान्यता दिल्यानंतर रशियाने तालिबानसोबत इतक्या उच्च पातळीचे संरक्षण सहकार्य प्रस्थापित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, या कराराबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. दोन्ही देशाने कराराला मान्यता दिल्याचे कळताच पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला. रशियावर टीका करता येत नसल्याने थेट भारतावर पाकिस्तानकडून टीका करण्यात आली.
कराराबाबत अधिक माहिती पुढे येऊ शकली नसलीतरीही, एका अहवालानुसार, तालिबान संरक्षणमंत्र्यांनी रशियाकडे एका आधुनिक हवाई संरक्षण प्रणालीची मागणी केली. अफगाणिस्तानलाही S-400 किंवा पॅन्टसिर हवाई संरक्षण प्रणाली मिळेल का, याबद्दल चर्चा आहे. सोव्हिएत युनियनच्या काळात अफगाणिस्तानवर आक्रमण करणारा रशिया, त्यावेळी तालिबानशी लढत होता. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सतत अफगाणिस्तानवर हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या लष्करी ताकदीपुढे अफगाणिस्तानची ताकद कमीच आहे.
आता अफगाणिस्तान लष्करी ताकद वाढवण्याकरिता प्रयत्न करत आहे. जर रशियाने S-400 अफगाणिस्तानला दिले तर त्यांची ताकद वाढले. मात्र, हा फक्त पाकिस्तानच नाही तर अमेरिकेलाही मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. चीन देखील अलर्ट मोडवर आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात चांगलीच मैत्री आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर भारताने अफगाणिस्तानला मदत पाठवली होती. सतत पाकिस्तान अफगाणिस्तानवर मोठे हल्ले करत आहे.