पाकिस्तानची सगळी इज्जत गेली, खेळाडूंवर चक्क भांडी धुण्याची वेळ; कॅप्टननेच समोर येत…

पाकिस्तानची जागतिक पातळीवर नाचक्की झाली आहे. पाकिस्तानी खेळाडूंवर चक्क भांडी धुण्याची वेळ आली आहे. हॉटेल नसल्याने त्यांना 10 तास ताटकळत बसावे लागले आहे.

पाकिस्तानची सगळी इज्जत गेली, खेळाडूंवर चक्क भांडी धुण्याची वेळ; कॅप्टननेच समोर येत...
PAKISTAN HOKEY TEAM
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 19, 2026 | 3:13 PM

Pakistan Hokey Team : पाकिस्तान हा देश नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. या देशत कधी महगाई तर कधी तेथील गरिबी याचे अनेक उदाहरणं जगभरात समोर आलेले आहेत. आता मात्र पाकिस्तान देशाचे खेळामध्येही कसे हाल आहेत, हे सांगणारे एक अजब असे उदाहरण समोर आले आहेत. ऑस्ट्रेलियात सामना खेळण्यासाठी गेलेल्या पाकिस्तीन टीमवर चक्क भांडे धुण्याची वेळ आली आहे. यासह पाकिस्तानच्या खेळाडूंना राहायला हॉटेलही न मिळाल्याने त्यांना चक्क दहा ते बारा तास ताटकळत बसावे लागले आहे. पाकिस्तानी संघाच्या कर्णधारानेच पुढे येऊन तसे धक्कादायक खुलासे केल्यामुळे जगभरात पाकिस्तानची नचक्की झाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा राष्ट्रीय हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी हॉकी टीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियात गेलेल्या पाकिस्तानी हॉकी संघाला सामन्यांदरम्यान पराभव पत्करावा लागला. परंतु पराभवापेक्षाही त्या संघाला मिळालेली वागणूक आणि संघातील खेळाडूंची झालेली परवड जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

आम्हाला भांडे धुवावे लागत असतील तर…

पाकिस्तानी हॉकी संघाचा कर्णधार शकील अम्माद बट याने समोर येऊन अशा प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आमची व्यवस्थित सोय केली नाही, असे शकील बट याने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर आमच्यासाठी हॉटेल बुक केलेले नव्हते. त्यामुळे आम्हाला अनेक तास भटकत राहावे लागले. त्यानंतर सिडनी एअरपोर्टवर कॅनबराला जाणारी फ्लाईट साधारण 13 ते 14 तास लेट झाली. आम्ही कसेबसे हॉटेलवर पोहोचलो तेव्हा आमचे बुकिंग नसल्याचे आम्हाला समजले, असे आरोप शकील बट याने केले आहेत. सोबतच सामना खेळण्याआधी आम्हाला भांडे धुवावे लागत असतील, किचन साफ करावे लागत असेल तर आमच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा कशी केली जाऊ शकेल, असा सवालही शकील बट याने उपस्थित केला.

आम्ही एक कोटी दिले होते, पाकिस्तानी हॉकी फेडरेशनचा दावा

दरम्यान, ऑस्ट्रेलियात खेळायला गेलेल्या पाकिस्तानी हॉकी टीमचा ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीविरोधात खेळताना पराभव झाला. पाकिस्तान हॉकी बोर्डाने मात्र आम्ही या संघाला हॉटेलमध्ये राहता यावे म्हणून पाकिस्तानी एक कोटी रुपयांची तजवीज केली होती, असा दावा केला आहे. असे असले तरी जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.