Pulwama Attack : कसलाही विचार न करता भारताचे आरोप : पाकिस्तानी लष्कर

इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कसलाही विचार न करता आरोप केले, मात्र चौकशी करत होतो, त्यामुळे आमच्याकडून उत्तर द्यायला उशीर झाला, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या लष्कराने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. 1947 पासून काश्मिरींवर अत्याचार होत आहेत, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने भारतावर केला आहे. “पाकिस्तान जेव्हा कधी काही महत्त्वपूर्ण होणार …

Pulwama Attack : कसलाही विचार न करता भारताचे आरोप : पाकिस्तानी लष्कर

इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कसलाही विचार न करता आरोप केले, मात्र चौकशी करत होतो, त्यामुळे आमच्याकडून उत्तर द्यायला उशीर झाला, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या लष्कराने पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

1947 पासून काश्मिरींवर अत्याचार होत आहेत, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने भारतावर केला आहे.

“पाकिस्तान जेव्हा कधी काही महत्त्वपूर्ण होणार असतं, त्याचवेळी भारताकडून असे आरोप केले जातात. पुलवामा हल्ल्यातून पाकिस्तानला काय फायदा आहे? उलट पाकिस्तानला नुकसानच आहे. कारण ग्लोबल फ्रंटवर पाकिस्तानला वेगळ पाडलं जात आहे.” असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानवर कुठल्याही पुरव्याविना आरोप केले आहेत, जेव्हा कधी भारतात हल्ले होतात, तेव्हा पाकिस्तानलचा जबाबदार ठरवले जाते, असेही पाकिस्तान लष्कराने म्हटले.

महत्त्वाचे मुद्दे :

  • पुलवामा एलओसीपासून खूप दूर – पाकिस्तानी लष्कर
  • काश्मीरचा प्रश्न भारताच्या हाताबाहेर गेलाय – पाकिस्तानी लष्कर
  • पाकिस्तानकडून नेहमीच शांततेसाठी प्रयत्न – पाकिस्तानी लष्कर
  • आम्ही दहशतवादाविरोधात लढतोय – पाकिस्तानी लष्कर
  • आम्हाला जगानं एकटं पाडलेलं नाही – भारतीय लष्कर
  • कुलभूषण हा भारतीय दहशतवादाचा चेहरा – पाकिस्तानी लष्कर
  • आम्ही दहशतवादाविरोधात लढतोय, शांततेसाठी पाकिस्तानकडून नेहमीच प्रयत्न – पाकिस्तानी लष्कर
  • पुलवामा हल्ल्यासारखे आरोप भारत नेहमीच पाकिस्तानवर करत आला आहे – पाकिस्तानी लष्कर
  • कसलाही विचार न करता भारताकडून पाकिस्तानवर आरोप – पाकिस्तानी लष्कर

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *