AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाहोर हादरलं, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट, 12 जखमी

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) पाकिस्तानातील लाहोरच्या जोहर टाऊन (Johar Town) येथील घराबाहेर स्फोट झाला आहे.

लाहोर हादरलं, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या घराबाहेर  स्फोट, 12 जखमी
हाफिज सईद
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 1:30 PM
Share

लाहोर: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) पाकिस्तानातील लाहोरच्या जोहर टाऊन (Johar Town) येथील घराबाहेर  स्फोट झाला आहे. डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार जौहर टाऊनमध्ये झालेल्या या हल्ल्यात 12 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा स्फोट शहरातील एहसान मुमताज हॉस्पिटलच्या(Ahsan Mumtaz Hospital) ई ब्लॉकजवळ झाला. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.( Pakistan Lahore Huge blast near Hafiz Saeed residence in Johar Town )

अ‌ॅम्ब्युलन्स सर्व्हिसचे प्रवक्त्यांनी स्फोट कोणत्या कारणामुळे घेण्यात आला याबाबत अद्याप माहिती समोर आली नसल्याचं सांगतिल. गॅसपाईप लाईन फुटल्यानं किंवा सिलेंडर फुटल्यानं स्फोट झाला काय याची माहिती घेण्यात असल्याचं अधिकाऱ्याकंडून सांगण्यात आलं आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाची तीव्रता लक्षात घेता जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोटात आतापर्यंत 12 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट कोणत्या कारणानं झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

लाहोरचे पोलीस उपायुक्त मुदस्सिर रियाज मलिक हे स्थानिक समा टीव्हीशी म्हणाले की, या स्फोटात महिला आणि लहान मुलांसह 12 लोक जखमी झाले. स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नाही, परंतु त्यामुळे घटनास्थळी प्रचंड मोठा खड्डा तयार झाला आहे. मलिक म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल तेव्हाच स्फोटाची कारणे समजतील. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोण आहे हाफिज सईद?

  • हाफिज सईद हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे
  • मुंबईवरील 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा प्रमुख हात होता.
  • दहशतवादी कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानातून मार्गदर्शन करणारा हाफिज सईदच होता
  • हाफिज सईद जमात-उल-दावा आणि लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
  • भारतामध्ये अनेक दहशतवादी कारवायांमध्ये या दोन्ही संघटनांचा प्रामुख्याने समावेश आहे.
  • काही वर्षांपूर्वी अमेरिकेने जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हाफिज सईदचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं.
  • हाफिजसाठी एक कोटी डॉलरचे रोख रकमेचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. हाफिज विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
  • भारतात 13 डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता.
  • मुंबईतील 11 जुलै 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याचा हात होता.
  • तो भारतातच नव्हे तर जगातील सर्वात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.

संबंधित बातम्या:

दहशतवादी हाफिज सईदवरील ट्वीटमुळे डोनाल्ड ट्रम्प ट्रोल

दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक, व्हिडीओ ‘टीव्ही-9’च्या हाती

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.