पाकिस्तानवर भारत मेहरबान, पाकिस्तानी मंत्र्याला ताजमहलला जाण्याची परवानगी, पण या ठिकाणी बंदी..

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध तणावात बघायला मिळाली. आता दोन्ही देशातील संबंध सुधारली आहेत. त्यातच पाकिस्तानचे मंत्री थेट भारत दाैऱ्यावर आले. आग्रातील ताजमहलला पाकिस्तानी मंत्री भेट देणार आहेत.

पाकिस्तानवर भारत मेहरबान, पाकिस्तानी मंत्र्याला ताजमहलला जाण्याची परवानगी, पण या ठिकाणी बंदी..
Pakistani minister
| Updated on: Nov 21, 2026 | 12:55 PM

पाकिस्तानचे जलवायू परिवर्तन मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दाैऱ्यावर आहेत. दोन्ही देशातील संबंध सुधारण्याच्या दिशेने ही महत्वपूर्ण दाैरा असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक हे ताजमहल पाहण्यासाठीही जाणार आहेत. त्यांनी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दरग्यात जाण्याचीही इच्छा सांगितली होती. पण सुरक्षेच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात आली. आग्रातील ताजमहलसोबतच इतर चार ऐतिहासिक ठिकाणांना देखील मंत्री मुसादिक मसूद मलिक भेट देतील. मुसादिक मसूद मलिक शंघाई सहयोग परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या उच्चायोगाने भारताकडे पाच ठिकाणी भेट देण्याची परवानगी मागितली होती.

ज्यात आग्रातील ताजमहल, दिल्ली हाट, हुमायूंचा मकबा, किल्ला राय पिथाैरा आणि हजरत निजामुद्दीन दरगाहाचे याचा यात समावेश होता. सुरक्षेच्या कारणामुळे अधिकाऱ्यांनी चार ठिकाणी जाण्याची परवानगी मागितली. पण निजामुद्दीन दरगाहाला जाण्याची परवानगी नाकारली. मुसादिक मलिक हे 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान दिल्लीच्या किल्ला येथे आयोजित एससीओ संवाद मंचाचे पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Loading...

मे 2025 नंतरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावात आली. या तणावानंतर पाकिस्तानमधून भारतात येणारे हे पहिले मंत्री ठरणार आहेत. पाकिस्तानकडून कोणी या परिषदेत सहभागी होणार नसल्याची चर्चा होती. भारत पाकिस्तान संबंधांवर मलिक यांनी मोठे भाष्य केले. मलिक यांनी म्हटले की, मतभेद दूर ठेऊन संवाद करणे आवश्यक आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर बोलताना मलिक यांनी म्हटले की, दोन्ही देशांमधील संबंध वेगाने बदलत आहेत. मतभेद असतानाही दोन्ही देश एका मंचावर आले आहेत. अनेक मुद्द्यांवर भाष्य होईल, संवादासाठी मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल एससीओने आभार मानले. मलिक यांच्या भारत दाैऱ्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. पाकिस्तानचे मंत्री आता भारत दाैऱ्यावर येत असल्याचे सांगून जोरदार टीका संजय राऊत यांनी केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही महिन्यांपूर्वी युद्धाची स्थिती निर्माण झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us