AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझी हत्या होणार’, इमरान खान यांनी बहि‍णीकडे दिली खळबळजनक माहिती, वाचा…

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे रावलपिंडीच्या अडियाल तुरुंगात आहेत. आज त्यांच्या बहिणीने तुरुंगात जात त्यांची भेट घेतली. या भेटीत इमरान खान यांनी असीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

'माझी हत्या होणार', इमरान खान यांनी बहि‍णीकडे दिली खळबळजनक माहिती, वाचा...
imran khanImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 02, 2025 | 10:19 PM
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे रावलपिंडीच्या अडियाल तुरुंगात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शाहबाज सरकाराने त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली नव्हती. मधल्या काळात त्यांची हत्या झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता ते जिवंत असल्याचे समोर आले आहे. आज त्यांच्या बहिणीने तुरुंगात जात त्यांची भेट घेतली. या भेटीत इमरान खान यांनी असीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आगामी काळात माझी हत्या होणार असं त्यांनी म्हटलं आहे. इमरान खान यांच्या बहिणीने काय माहिती दिली याबाबत माहिती जाणून घेऊयात.

बहिणीने घेतली भेट

इमरान खान यांची बहीण उज्मा खातून यांनी त्यांची भेट घेतली. सुमारे 20 मिनिटांच्या भेटीनंतर उज्मा यांनी सांगितले की, इमरान खान यांची प्रकृती ठीक आहे, मात्र ते एकांतात आहे, त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच उज्मा यांनी इमरान यांनी त्यांच्याकडे दिलेल्या खळबळजनक माहितीवरही भाष्य केले आहे. उज्मा आणि इमरान खान यांच्यातील भेटीनंतर पीटीआयने एक निवेदन जारी करत दोघांमधील संवादाची माहिती दिली आहे. यानुसार इमारान खान यांनी खालील विधाने केली आहेत.

इमरान खान यांनी बहिणीकडे दिली महत्त्वाची माहिती

इमरान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर आरोप करत म्हटले की, मुनीर यांचे सरकार मला बेकायदेशीरपणे ताब्यात घेत आहे आणि आता ते माझी हत्या करू शकतात. माझ्या विरुद्धचे सर्व खटले रद्द होणार आहेत, त्यामुळे मला लष्करी न्यायालयात नेण्याची तयारी सुरू आहे. तुरुंगातील सर्व व्यवस्था आयएसआयच्या नियंत्रणाखाली आहेत आणि आगामी काळात मला काही झाले तर यासाठी मुनीर, डीजी आणि आयएसआय जबाबदार असतील.

पुढे बोलताना इमरान खान यांनी म्हटले की, ‘मला एकांतात ठेवण्यात येत आहे, माझी कोठडी भट्टीसारखी तापते. मला माझ्या मुलांशी बोलण्याची परवानगी नाही, मला मृत्युदंड ठोठावलेल्या कैद्यांसारख्या सुविधा मिळतात. मला पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते, 5 दिवस त्यांची वीज खंडित करण्यात आली होती, मला कुणाला भेटूही दिलं नाही. मात्र मी हुकूमशाही स्वीकारणार नाहीत आणि विजय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवेल. या देशात कायदा नाही तर ‘असिम कायदा’ चालू आहे. जर मला तुरुंगात त्यांना काही झाले तर या असीम मुनीर जबाबदार असतील.’

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ