India-Pakistan War : पाकिस्तानने कुठे-कुठे लपवलेत त्यांचे अणूबॉम्ब? सिक्रेट रिपोर्टमधून महत्त्वाचा खुलासा

India-Pakistan War : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कारवाई करण्याआधी पाकिस्तान सातत्याने त्यांच्याकडे अणूबॉम्ब असल्याची धमकी देत होता. पण भारताने त्यांचा हा भ्रम मोडून काढलाय. तुमच्याकडे अणूबॉम्ब असला, तरी आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, हे भारताने आपल्या कारवाईतून स्पष्ट केलय. आता पाकिस्तानने त्यांची अणवस्त्र कुठे लपवून ठेवलेली असू शकतात, त्या बद्दल एक रिपोर्ट समोर आलाय.

India-Pakistan War : पाकिस्तानने कुठे-कुठे लपवलेत त्यांचे अणूबॉम्ब? सिक्रेट रिपोर्टमधून महत्त्वाचा खुलासा
Pakistan Nuclear Arsenal
Image Credit source: AI Genreated Image
| Updated on: May 09, 2025 | 2:24 PM

पाकिस्तानने आपली अणवस्त्र अनेक गुप्त ठिकाणी लपवली आहेत. याची स्पष्ट माहिती मिळणं कठीण आहे. पण उपग्रह फोटोंच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या संभाव्य अणवस्त्रांच्या ठिकाणाबद्दल बरीच काही माहिती मिळाली आहे. FAS (फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट) एका रिपोर्टनुसार सॅटेलाइटमधून काढण्यात आलेल्या या फोटोनुसार पाकिस्तानात अनेक ठिकाणी शॉर्ट रेंज अणवस्त्र वाहून नेणाऱ्या मिसाइलसाठी क्षेपणास्त्र चौक्या, अणवस्त्र डेपो आणि भूमिगत फॅसिलिटी बनवण्यात आली आहे.

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायटिंस्टच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या अणवस्त्र सक्षम मिसाइल ठिकाणांची एकूण संख्या आणि स्थान निश्चितपणे सांगता येणार नाही. पण सॅटलाइट फोटोंवरुन कमीत कमी पाच अशी ठिकाणं आहेत, जिथे पाकिस्तानच्या अणवस्त्रांचा साठा असू शकतो. यात अक्रो (पेटारो), गुजरांवाला, खुजदार, पानो अकील आणि सरगोधा हे बेस असू शकतात. बहावलपूर येथे सहावा बेस निर्माणाधीन असू शकतो.

अक्रो गॅरिसन : हा बेस पाकिस्तानच्या हैदराबादपासून 18 किमी (11मैल) अंतरावर उत्तरेला सिंध प्रांताच्या दक्षिण भागात अक्रो आणि पेटारोच्यामध्ये भारतीय सीमेपासून 145 किमी अंतरावर आहे. हा गॅरिसन 6.9 वर्ग किमी (2.7 वर्ग मैल) क्षेत्रात पसरलेला आहे. 2004 मध्ये याचा भरपूर विस्तार करण्यात आला. (या बेसबद्दल सर्वप्रथम जर्मनच्या शौकिया सॅटेलाइट इमेजरी उत्साही मार्टिन बुल्लाने सांगितलं होतं) अक्रो गॅरिसनमध्ये एक वेगळी भूमिगत सुविधा आहे. जी मिसाइल TEL (ट्रांसपोर्टर इरेक्टर लॉन्चर) गॅरेज परिसराच्या खाली आहे.

गुजरांवाला गॅरिसन: हा विशाल बेस परिसर जवळपास 30 वर्ग किलोमीटर (11.5 वर्ग मैल) क्षेत्रात पसरलेला आहे. पंजाब प्रांताच्या उत्तरपूर्वेला (32.2410, 74.0730) स्थित आहे. भारतीय सीमेपासून जवळपास 60 किलोमीटर (37 मैल) दूर आहे. 2010 पासून बेसने परिसराच्या पश्चिमी भागात एक TEL लॉन्चर क्षेत्र जोडलेलं आहे. है. लॉन्चरच्या सर्विसिंगसाठी टेक्निकल क्षेत्र सुद्धा आहे. TEL क्षेत्र 2014 आणि 2015 मध्ये चालू झालं.

खुजदार गॅरिसन : खुजदार गॅरीसन दक्षिण-पूर्व बलूचिस्तान प्रांताच्या सुक्कुरपासून जवळपास 220 किलोमीटर (136 मील) पश्चिमेला स्थित आहे. भारतीय सीमेपासून (295 किलोमीटर किंवा 183 मैल) दूर आहे. हा बेस दोन भागांमध्ये विभाजीत आहे. उत्तरी आणि दक्षिण भाग.

पानो अकील गॅरिसन : पानो अकील गॅरिसन अनेक खंडांमध्ये विभाजित आहे. 20 वर्ग किलोमीटर (7.7 वर्ग मैल) संयुक्त क्षेत्राला कव्हर करतो. यात मुख्य गॅरीसन क्षेत्र, एक टीईएल क्षेत्र एक युद्ध सामुग्री डेपो, एक हवाई क्षेत्र आणि एक शूटिंग रेंज आहे. हा बेस सिंध प्रांताच्या उत्तरेला भारतीय सीमेपासून जवळपास 80 किलोमीटर (50 मैल) दूर आहे. टीईएल क्षेत्र मुख्य गॅरीसनपासून 1.8 किलोमीटर (1.2 मैल) उत्तर-पूर्वेला स्थित आहे.

सरगोधा गॅरिसन : सरगोधामध्ये पाकिस्तानाच मोठा युद्ध साहित्याचा डेपो आहे. तिथे बऱ्याच काळापासन TEL गॅरेज असल्याची अफवा आहे. ही सुविधा 1990 पासून आहे, जेव्हा पाकिस्तानने पहिल्यांदा चीनकडून M-11 मिसाईल्स (DF-11 या CSS-7) घेतली होती.