कोरोनाचं थैमान, शत्रुत्व विसरुन पाकिस्तानचा भारताला मदतीचा हात, इम्रान सरकारकडून ‘ही’ ऑफर

भारतात कोरोनाने थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध आणि शत्रूत्व विसरत भारताला मदतीचा हात दिलाय.

कोरोनाचं थैमान, शत्रुत्व विसरुन पाकिस्तानचा भारताला मदतीचा हात, इम्रान सरकारकडून 'ही' ऑफर

Pakistan offers Covid-19 relief to India इस्लामाबाद : भारतात कोरोनाने थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध आणि शत्रूत्व विसरत भारताला मदतीचा हात दिलाय. भारतात कोरोना रुग्णांचे आकडे दररोज नवा विक्रम करत आहेत. मागील 3 दिवसांमध्ये जगात इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक कोरोना रुग्ण भारतात सापडत आहेत. यानंतर पाकिस्तानने देखील भारताला मदतीची ऑफर दिलीय (Pakistan offer medical help to India amid increasing Corona infection).

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, “कोरोनाच्या या प्रकोपात पाकिस्तान भारताला आवश्यक वैद्यकीय साहित्य देऊ इच्छितो. कोरोना विषाणूच्या या संकटाच्या काळात आम्ही भारतासोबत आहोत. पाकिस्तानकडून मदतीच्या स्वरुपात भारताला व्हेंटिलेटर, बायपाईप मशीन, डिजिटल एक्सरे मशीन, पीपीई किट आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य देऊ इच्छित आहे.’

“भारताला लवकरात लवकर ही मदत मिळावी यासाठी दोन्ही देश एकत्र येऊन काम करु शकतात. दोन्ही देश मिळून साथीरोगामुळे तयार झालेल्या आव्हानांचा सामना करण्याचे मार्ग शोधू शकतात,” असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.

इम्रान खान यांच्याकडून काळजी व्यक्त

पाकिस्तानकडून मदतीचा हात पुढे करण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतातील बिघडत्या कोरोना परिस्थितीबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यांनी शनिवारी (24 एप्रिल) ट्वीट करत भारतासोबत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच कोरोना रुग्ण लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. आपल्याला मानवतेसोबत मिळून या जागतिक आव्हानाचा सामना करायला हवा असंही त्यांनी नमूद केलं होतं.

ईधी फाऊंडेशनकडूनही मदतीचा हात

दरम्यान, याआधी पाकिस्तानच्या ईधी वेलफेयर ट्रस्टने भारताला 50 रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना भारतात पाठवण्याची तयारी दर्शवली होती. ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रुग्णवाहिका पाठवण्याची तयारी दाखवली होती. ट्रस्टचे प्रमुख फैसल ईधी म्हणाले होते, “ट्रस्टला कठीण काळात भारताविषयी सहानुभुती आहे. आम्ही भारताच्या मदतीसाठी रुग्णवाहिका पाठवू शकतो.”

Pakistan offer medical help to India amid increasing Corona infection

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI