AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान मोठ्या संकटात, 15 ऑगस्टला पहाटे 6 वाजल्यापासून काय घडणार? अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम

पाकिस्तानात 15 ऑगस्टपासून पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा डिलर्सनी इशारा दिला आहे. डिलर्सनी किरकोळ विक्रीतील मार्जिन 8 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली असून, सरकारने आश्वासन देऊनही ती पूर्ण न झाल्याने 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. "डेली प्राइस मॅकेनिज्म" आणि वाढत्या खर्चांमुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान मोठ्या संकटात, 15 ऑगस्टला पहाटे 6 वाजल्यापासून काय घडणार? अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम
Petroleum dealers issueImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 11:09 AM
Share

पाकिस्तानात पेट्रोल पंप चालवणारे डिलर आणि सरकारच्या दरम्यान वाद वाढला आहे. पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएनने सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 15 ऑगस्टच्या पहाटे 6 वाजल्यापासून संपूर्ण पाकिस्तानात अनिश्चित काळासाठी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा या डीलरांनी दिला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत पेट्रोल पंप उघडण्यात येणार नाही, असा इशाराच या डिलरांनी दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानात 15 ऑगस्टपासून इंधन संकट घोंघावण्याची शक्यता वाढली आहे.

पीपीडीएचे चेअरमन मलिक खुदा बख्श यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत व्यवसाय चालवणं कठिण झालं आहे. देशभरातील डिलरांसोबत झालेल्या बैठकीनंतर असोसिएशनने पेट्रोलच्या किरकोळ विक्रीतील आपली मार्जिन 8 टक्क्याने वाढवून देण्याची मागणी केली, असं मलिक खुदा बख्श यांनी सांगितलं. ही मागणी पूर्ण करण्यासाठी असोसिएशनच्या 14 हजार सदस्यांनी कारवाईसाठी दबाव वाढवल्याची माहितीही त्यांनी दिली.

आश्वासन देऊनही पूर्ण नाही

या आधी सरकारने दोन आठवड्यात डिलरांच्या समस्यांवर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं. पीपीडीएचे चेअरमनने 7 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांना डिलरांच्या समस्यांची माहिती दिली होती. यापूर्वीही डिलर देशभरात संप पुकारणार होते. पण त्यावेळी पेट्रोलियम मंत्र्यांनी त्यांना संप टाळण्यास सांगितलं. तसेच दोन आठवड्याच्या आत तुमचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र, डीलरांच्या म्हणण्यानुसार, मंत्र्याने आश्वासन देऊनही समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळेच सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

रोज भाव बदलतात

डीलरांची सर्वात मोठी तक्रार ही पाकिस्तानच्या डेली प्राइस मॅकेनिज्म व्यवस्थेबाबतची आहे. या व्यवस्थेत पेट्रोलच्या किंमतीत वारंवार बदल होतात. पीपीडीएच्या म्हणण्यानुसार, या पेट्रोल पंप मालकांना आपल्या जुन्या स्टॉकवर नुकसान सोसावं लागतं. डीलरांच्या मते, यामुळे व्यवसाय चालवण्यासाठी पैसा कमी पडू लागला आहे. दुसरीकडे महागाई वाढल्याने पेट्रोल पंप चालवण्याचा खर्चही वाढला आहे. वीज आणि गॅसचे बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्चांचा बोझा वााढला आहे. सध्या जे कमिशन मिळत आहे, त्यातून हा खर्च भागवणं कठिण झालं आहे.

आता 72 तासात पाकिस्तान सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. जर सरकार आणि डिलरांमध्ये तडजोड नाही झाली तर 15 ऑगस्टच्या पहाटे 6 वाजल्यापासून पेट्रोल पंप चालक अनिश्चितकालीन संपावर जाणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानात पेट्रोल- डिझेलचा पुरवठा, लोकांची ये-जा आणि दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना नव्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे.

Follow Us
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप