AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : ‘कधीही बातमी येऊ शकते शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत’, पुण्यातील शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena : राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्या संदर्भात पुण्यातील शिवसेना नेत्याने केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Shivsena : 'कधीही बातमी येऊ शकते शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत', पुण्यातील शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Eknath Shinde
| Updated on: Sep 29, 2026 | 12:12 PM
Share

एकनाथ शिंदे शिवसेनेचे नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु होऊ शकतो. “एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपं जिवंत झाली, अन्यथा भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिला नसता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप सत्तेत कुठे होता? एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतरच भाजप सत्तेत आली” असा दावा चंद्रकांत रघुवंशी यांनी केला. चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यावर आता पुण्याचे शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर बोलले आहेत. “मागच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा बघूनच लोकांनी मतदान केले. त्यामुळेच राज्यात सत्ता आली” असं धंगेकर म्हणाले.

“शिंदे साहेब शांत बसलेत म्हणजे लवकरच बातमी येऊ शकते ते मुख्यमंत्री झालेत. कधीही बातमी येऊ शकते शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत” असं धंगेकर म्हणाले. शिवसेनेचे दुसरे आमदार संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यात सुरु असलेल्या राजकीय वादावरही धंगेकर बोलले. “संजय गायकवाड हे खरं बोलतात. त्यांच्या पोटात आणि ओठात एकच असतं. राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात जे दिसते ते खरं नाही” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

संतोष पंडितला कार्यालयात बोलावून त्याचा सत्कार

माजी आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर हे सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेत असतात. रविंद्र धंगेकर यांनी नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या संतोष पंडित यांचा सत्कार केला. युट्युबर संतोष पंडितने भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना असंसदीय शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे संतोष पंडितला पुणे पोलिसांनी रात्री एक वाजता घरातून अटक केली होती. संतोष पंडितच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रवींद्र धंगेकर यांची भूमिका भाजपविरोधी राहिली आहे. संतोष पंडितच्या सत्कारावरुन ते भाजपविरोधी विचारांना प्रोत्साहन देत असल्याचं दिसतं. रवींद्र धंगेकर यांनी संतोष पंडितला कार्यालयात बोलावून त्याचा सत्कार केला.

“संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती. संतोष पंडित यांना माझे समर्थन आहे. पोलीस नेमकं कुणासाठी काम करत आहेत?” अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली होती.

Follow Us
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा