Shehbaz Sharif : नक्कल करतात पण अक्कल नाही, पाकिस्तानी PM शहबाज शरीफ रणगाड्यावर चढले आणि म्हणाले….

Shehbaz Sharif : सध्या भारताकडून जे केलं जातं, त्याची जशीच्या तशी कॉपी पाकिस्तानात सुरु आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर सैन्य तळाला भेट दिली. बुधवारी शहबाज शरीफ यांच्यासोबत आर्मी चीफ असीम मुनीर, पाकिस्तानचे एअर चीफ आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ होते.

Shehbaz Sharif : नक्कल करतात पण अक्कल नाही, पाकिस्तानी PM शहबाज शरीफ रणगाड्यावर चढले आणि म्हणाले....
Pakistan Army
| Updated on: May 15, 2025 | 10:43 AM

तीन दिवसांच्या सैन्य संघर्षात भारताकडून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तान सुधरत नाहीय. आपली अब्रू वाचवण्यासाठी पाकिस्तान सैन्य आणि सरकारकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. पाकिस्तानात विजयाचे खोटे ढोल बडवले जात आहेत. यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि त्यांचे पंतप्रधान शहबाज शरीफ आघाडीवर आहेत. सध्या भारताकडून जे केलं जातं, त्याची जशीच्या तशी कॉपी पाकिस्तानात सुरु आहे. भारताच्या DGMO ने पत्रकार परिषद घेतल्यानंतर पाकिस्तानातही काहीवेळाने तशीच पत्रकार परिषद होते, ज्याला तिन्ही सैन्य दलांचे अधिकारी उपस्थित असतात. तिथे कुठलेही पुरावे दाखवल्याशिवाय पाकिस्तानी शौर्यच गुणगान केलं जातं. पाकिस्तानी जनतेला दिशाभूल करणारी खोटी माहिती दिली जाते. भारत जे करणार, तेच सगळं पाकिस्तान करतो.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर सैन्य तळाला भेट दिली. मोदींनी एअर फोर्सच्या आणि सैन्याच्या जवानांची भेट घेतली. पाठिवर थाप मारुन त्यांच्या शौर्याच कौतुक केलं. महत्त्वाच म्हणजे या दौऱ्यातील मोदीचे जे फोटो समोर आले, त्यातून पाकिस्तानचा सगळा खोटेपणा उघडा पडला. पाकिस्तानने मागच्या आठवड्यात शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं की, पाकिस्तानी सैन्य दलाने आदमपूर एअर बेसच नुकसान केलय. भारताची S-400 सिस्टिम नष्ट केलीय. पण मोदींच्या आदमपूर बेसवरच्या फोटोंमध्ये तिथवी धावपट्टी आणि S-400 सिस्टिम पूर्णपणे सुरक्षित असल्याच दिसलं. यातून पाकिस्तानचा खोटा चेहरा उघड झाला. मोदींच्या आदमपूर दौऱ्याने खूप काही साध्य केलं.

पूर्ण ड्रामा केला

आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोदींची कॉपी केलीय. बुधवारी त्यांनी सियालकोटच्या पसरुर लष्करी छावणीला भेट दिली. 10 मे रोजी इंडियन आर्मीने या कॅम्पमधील रडार सिस्टिम नष्ट केली होती. सैनिकांना भेटण्यासाठी आलेल्या शहबाज शरीफ यांनी पूर्ण ड्रामा केला. त्याच जुन्याच गोष्टींचा शहबाज यांनी पुनरुच्चार केला.

गवताने हा टँक झाकलेला

टोपी घालून पंतप्रधान शहबाद शरीफ पसरुरच्या लष्करी छावणीमध्ये आले. तिथे एका रणगाड्यावर उभे राहिले आणि तिथूनच भाषण सुरु केलं. या रणगाड्याच्या मागे एक पोस्टर लागलेलं. या पोस्टरवर भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेलेल्यांचे फोटो होते. गवताने हा टँक झाकलेला होता. युद्धाची स्थिती आहे, अशा पद्धतीने काही गोष्टी सादर केल्या.

रिसर्च करुन पुस्तक लिहिणार

आपल्या भाषणात शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याचं कौतुक केलं. रिटायर झाल्यानंतर ‘मी तुमच्या शौर्याबद्दल रिसर्च करुन पुस्तक लिहिणार आहे’ असं शहबाज शरीफ यांनी सैनिकांसमोर म्हटलं. वास्तवात या लढाईत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे. जगाने भारताचा विजय मान्य केलाय. पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांना तिथल्या राजकारणात टिकून राहण्यासाठी खोटं बोलाव लागतय.