AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान वठणीवर, भारताच्या अटींवर चर्चेस तयार, परराष्ट्रमंत्री म्हणाले, ‘ज्या पद्धतीने म्हणाल…’

पाकिस्तान भारताच्या अटींवर चर्चा करण्यास तयार झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. भविष्य आम्ही सांगू शकत नाहीत, परंतु भारतासोबत संघर्षाच्या परिस्थितीची शक्यता खूपच कमी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान वठणीवर, भारताच्या अटींवर चर्चेस तयार, परराष्ट्रमंत्री म्हणाले, 'ज्या पद्धतीने म्हणाल...'
ishaq dar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 05, 2025 | 9:17 AM
Share

भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान वठणीवर आले आहे. पाकिस्तानला आता भारतासोबत चर्चा हवी आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी त्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भारतासोबत चर्चेसाठी इस्लामाबादची तयारी आहे. आमचा देश प्रत्येक स्तरावर चर्चा करण्यास तयार आहे. भारतासोबत आम्हाला व्यापक चर्चा करायची आहे.

सर्व मुद्यांवर चर्चा करणार

रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, इस्लामाबादमधील एका पत्रकार परिषदेत इशाक डार यांनी म्हटले की, भारत जेव्हाही चर्चेसाठी म्हणत असेल, तेव्हा चर्चा करण्याची आमची तयारी आहे. कोणत्याही स्तरावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. चर्चेसाठी आमची तयारी असली तरी आम्ही निराश झालेलो नाही. पाकिस्तान सर्वच मुद्यांवर चर्चा करु इच्छितो. परंतु भारत फक्त दहशतवाद्यावर फोकस करत आहे.

डार यांनी म्हटले की, चर्चेसाठी दोन लोकांची गरज असते. चर्चेसाठी आमच्या इतके गंभीर इतर कोणीच नाही. डार यांचे संकते भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या वक्तव्याकडे होते. जयशंकर यांनी म्हटले होते की, पाकिस्ताससोबत चर्चा दहशतवादाचा मुद्यावर होणार आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर रिकामे करण्यावर होणार आहे.

पुन्हा संघर्षाची शक्यता नाही…

भारतासोबत नव्याने संघर्ष होण्याची शक्यता विचारली असता, डार म्हणाले की, भविष्य आम्ही सांगू शकत नाहीत, परंतु अशा कोणत्याही परिस्थितीची शक्यता खूपच कमी आहे. शस्त्रसंधीचा निर्णय अबाधित राहणार आहे. दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याशी संबंधित सर्व पावले अंमलात आणली आहेत. या परिस्थितीत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता नाही, असे त्यांनी म्हटले.

पहलगाव येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात २६ पर्यटकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. त्यानंतर भारताने ६ ते ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळ नष्ट केली होती. भारताच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने परतवून लावले होते. यामुळे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव आल्यानंतर १० मे रोजी शस्त्रसंधी करण्यात आली.

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी