
काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यांमध्ये चांगलेच गाजले. पाकिस्तानकडे अणूबॉम्ब आहे, असे भीती घालण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्याने केला. कंगाल असलेल्या पाकिस्तानला आपल्याकडे नेहमी अणूबॉम्ब हवा होता. परंतु अणूबॉम्ब बनवण्यासारखे तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञ त्यांच्याकडे नव्हते. पाकिस्तानला अणूबॉम्ब बनवण्यासाठी चीनने मदत केल्याचे संपूर्ण जगाला माहीत आहे. परंतु पाकिस्तानमध्ये अणू तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी तस्कर आणि भंगारवाल्यांनी मदत केल्याचा कबुलीनामा ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिला.
पाकिस्तानी पत्रकार आणि विश्लेषक रिजवान उर रहमान राजी यांनी आपल्या “राजीनामा” कार्यक्रमात धक्कादायक स्पष्टीकरण दिले. राजी यांनी सांगितले की, ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कदीर खुद यांना मला सांगितले होते की, पाकिस्तानमधील अणूबॉम्बचे श्रेय शास्त्रज्ञांना नाही तर तस्करांना दिले पाहिजे. अणू तंत्रज्ञानसंदर्भात कोण काय बनवत आहे, कोणत्या देशात काय तयार होत आहे, ही माहिती आम्ही पाकिस्तानी एजंटांना देत होतो. पाकिस्तानी एजंट ते मिळवत होते. परंतु त्यापुढेच सर्वात मोठी समस्या होती.
विदेशातून चोरट्या मार्गाने मिळालेले अणूबॉम्बचे तंत्रज्ञान आणि सामग्री पाकिस्तानात आणयची कशी? हा मोठा प्रश्न होता. मग या कामासाठी सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्करांची मदत झाली. त्यांनी आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान पाकिस्तानात पोहचवले. अर्थात गरजेनुसार भंगारवाल्यांची त्यासाठी मदत घेतली गेली.
रिजवान राजी यांनी आणखी एक कबुली आपल्या कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानने अमेरिकेला धोका देऊन त्यांचा पैसा अणू तंत्रज्ञान मिळवण्यासाठी वापरला. अमेरिका अफगाणिस्तामध्ये असलेल्या राशियाशी लढण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत पाकिस्तानला देत होता. त्या पैशांची हेराफेरी करुन तो अणू तंत्रज्ञान मिळवण्यासाठी वापरला. पाकिस्तानचे माजी सैन्यप्रमुख जिया उल हक यांचा उल्लेख करत राजी यांनी म्हटले की, पाकिस्तानने पाच अब्ज डॉलरसाठी अमेरिकेसाठी अफगाणिस्तानशी युद्ध केले. त्यावेळी मुजाहिदीनांना देण्यासाठी शस्त्र येत होते, ती पाकिस्तान चोरत असल्याचे त्यांनी म्हटले होते.