AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Price: गरिबांसाठी पेट्रोल 100 रुपयांनी स्वस्त, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, पण शहबाज सरकार लाभार्थ्यांना कसं ओळखणार?

Petrol Diesel Cheaper in Pakistan: पाकिस्तान सरकारने सर्वसामान्यांसह गरिबांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल या वर्गासाठी 100 रुपयांनी स्वस्त होणार आहे. पण शहबाज सरकार या लाभार्थ्यांना ओळखणार कसं?

Petrol Price: गरिबांसाठी पेट्रोल 100 रुपयांनी स्वस्त, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, पण शहबाज सरकार लाभार्थ्यांना कसं ओळखणार?
सर्वसामान्यांसाठी पेट्रोल स्वस्ताई योजनाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 15, 2026 | 11:17 AM
Share

पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किंमती 370 रुपये प्रति लिटरवर पोहचल्या आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्वसामान्य नागरिकांसह गरिबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्राईम मिनिस्टर फ्यूएल रिलीफ स्कीम जाहीर केली आहे. त्यातंर्गत पेट्रोलपंपावर सामान्यांना थेट 100 रुपये प्रति लिटरची सवलत देण्यात येणार आहे. गरजवंतांनाच या योजनाचा लाभ देण्यात येणार आहे. सरकारी कर्मचारी, व्यापारी आणि मोठ्या व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. इस्लामाबादमध्ये केंद्रीय मंत्री अता तरार, शाजा फातिमा आणि अली परवेज मलिक यांनी या निर्णयाची माहिती दिली. विशेष म्हणजे या योजनेसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. घरबसल्या नागरिक त्यांच्या मोबाईलमध्ये सरकारी सेवा प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून सवलतीत पेट्रोल मिळवू शकतील.

कसा होईल फायदा?

बाईक आणि रिक्षा चालक: दुचाकी आणि तीनचाकी रिक्षा चालकांना दरमहा जास्तीत जास्त 20 लिटर पेट्रोलवर 100 रुपये प्रति लिटरची सवलत मिळेल. एका टोकनवर 5 लिटर पेट्रोल मिळेल, त्यावर थेट 500 रुपयांची बचत होईल.

800cc पर्यंतच्या कार चालकांना दिलासा: 800 सीसी इंजिन क्षमता असणाऱ्या कार चालकांनाही या योजनेचा लाभ मिळेल. त्यांना प्रत्येक महिन्यात 30 लिटरपर्यंत पेट्रोलवर 100 रुपये प्रति लिटरची सवलत देण्यात येणार आहे. कारसाठी एका टोकनवर 10 लिटर पेट्रोल मिळेल. त्यावर एक हजार रुपयांची बचत होईल.

अशी होणार नोंदणी

पाकिस्तानमधील आयटी आणि दूरसंचार राज्य मंत्री शाजा फातिमा यांनी त्यासाठी सरकारच्या ॲपवर मोबाईलमधून नोंदणी करावी लागेल असे स्पष्ट केले. नागरिक घरबसल्या या ॲपवर नोंदणी करून स्वस्त पेट्रोल मिळवू शकतील. या योजनेसाठी मोबाईल एसएमएसद्वारे सुद्धा नोंदणी करता येणार आहे. ज्या व्यक्तीच्या नावे सिम कार्ड आहे. त्याची पडताळणी होील. त्यानंतर वाहन क्रमांका आधारे पडताळणी होईल.

डिजिटल पेट्रोल टोकन

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डिजिटल पेट्रोल टोकन प्राप्त करण्यासाठी नागरिकांना 9771 वर “TOK” असे लिहून एसएमएस पाठवावा लागेल. निश्चित केलेल्या पेट्रोल पंपावर हे टोकन दाखवल्यावर पंपावरील कर्मचारी टोकनचा पडताळा करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना स्वस्तात पेट्रोल देण्यात येईल. फोन कॉल, एसएमएस वा व्हॉट्सॲपवर टोकन नंबर सरकार मागणार नाही असे शाजा फातिमा यांनी स्पष्ट करत ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?