AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान भारतीय सैन्यावर ‘टेक्टिकल न्यूक्लियर वेपन’ वापरणार? पाकिस्तानी एक्सपर्टचा सर्वात मोठा दावा

Pakistan Nuclear Bomb: पाकिस्तानने आपल्या जमिनीवर भारतीय लष्करावर हल्ला केला तर भारताला त्यांच्या 2003 मधील अण्वस्त्र सिद्धांतानुसार एक मोठी संधी मिळेल. कारण भारतीय लष्करावर कुठेही विध्वंसक अस्त्र वापरल्यास भारत जोरदार प्रत्युत्तर देणार आहे.

पाकिस्तान भारतीय सैन्यावर 'टेक्टिकल न्यूक्लियर वेपन' वापरणार? पाकिस्तानी एक्सपर्टचा सर्वात मोठा दावा
Pakistan Nuclear Bomb
| Updated on: Dec 11, 2024 | 10:18 AM
Share

Pakistan Nuclear Bomb: पाकिस्तानला अणूबॉम्ब काय मिळाला? त्यांच्यासाठी ते एखादे खेळणे झाले आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि काही लष्करी अधिकारी अणूबॉम्बचा वापर करण्याची धमकी भारताला देत असतात. पाकिस्तानकडे असलेला अणूबॉम्ब हा भारतासाठी नाही तर जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. पाकिस्तानी कट्टरपंथींना हा अणूबॉम्ब मिळाला तर काय होईल? याची कल्पना करु शकत नाही. दरम्यान, डॉक्टर कमर चीमा यांनी इस्लामाबादच्या कायद-ए-आझम विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अदनान बुखारी यांच्याशी पाकिस्तानची अण्वस्त्रे आणि भारत-पाकिस्तान संबंध यावर चर्चा केली आहे. यावेळी डॉ अदनान बुखारी यांनी पाकिस्तानची आण्विक शक्ती काय आहे हे सांगितले.

2011 मध्ये टेक्टिकल न्यूक्लियर वेपन पाकिस्तानी लष्कारात

पाकिस्तानच्या अणवस्त्रासंदर्भात बोलताना डॉक्टर बुखारी यांनी म्हटले की, जपानवर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणूबॉम्ब टाकण्यात आला होता. त्यामुळे जपानचे मोठे नुकसान झाले. अमेरिकामध्ये 1950 मध्ये टेक्टिकल न्यूक्लियर वेपन बनवले गेले होते. भारत आणि पाकिस्तानने 1990 च्या दशकात अणूचाचणी केली. त्यानंतर 2011 मध्ये टेक्टिकल न्यूक्लियर वेपनचा पाकिस्तानने त्यांच्या लष्करात समावेश केला.

पाकिस्तान अण्वस्त्र वापरल्यास काय होणार?

कमर चीमा यांनी विचारले की पाकिस्तान भारताच्या कोणत्याही जवळच्या शहरात टेक्टिकल न्यूक्लियर वेपन वापरल्यावर काय होणार? त्यावर बोलताना बुखारी म्हणाले, दोन्ही देश जवळ आहे. टेक्टिकल न्यूक्लियर वेपन 0.5 किलो ते 15 टन पर्यंत असतात. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर 15 ते 25 टन क्षमतेचे अणूबॉम्ब टाकले गेले होते. ते शहरांमध्ये टाकले होते. दुसरीकडे टेक्टिकल न्यूक्लियर वेपनचा टारगेट मिलिट्रीवर करता येऊ शकतो. 0.5 किलो टन का टेक्टिकल न्यूक्लियर वेपनचा परिणाम जवळपास अर्धा किलोमीटर असतो.

तो धोरणात्मक निर्णय असणार?

भारतीय लष्कराने पाकिस्तानवर ताबा मिळवला? भारतीय लष्कर पाकिस्तानच्या जमिनीवर असले? तेव्हा पाकिस्तानी आर्मी टेक्टिकल न्यूक्लियर वेपनचा वापर करु शकते का? त्यावर बोलताना डॉक्टर बुखारी म्हणाले, जर या पद्धतीचे परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे हा धोरणात्मक निर्णय असेल. पाकिस्तानी टेक्टिकल न्यूक्लियर वेपनचा वापर करू शकते. परंतु यामुळे दोघांसाठी अडचणी निर्माण होतील.

पाकिस्तान भारताला संधी देईल

बुखारी पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या जमिनीवर भारतीय लष्करावर हल्ला केला तर भारताला त्यांच्या 2003 मधील अण्वस्त्र सिद्धांतानुसार एक मोठी संधी मिळेल. कारण भारतीय लष्करावर कुठेही विध्वंसक अस्त्र वापरल्यास भारत जोरदार प्रत्युत्तर देणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर हानी होईल. भारताने आधी अण्वस्त्रांचा वापर न करण्याचे बंधन स्वत:ला घातले आहे. यामुळे जर पाकिस्तानने हल्ला केल्यास भारतासाठी ती संधी ठरणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.