AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

48 तासाच्या आत देश सोडा.. संयुक्त अरब अमिरातीची धक्कादायक घोषणा, जगात मोठी खळबळ, कर्मचाऱ्यांना..

पाकिस्तान आणि युएईमधील संबंध तणावात आहेत. पाकिस्तानला मोठा झटका युएईने दिला. त्यांनी दिलेले मोठ्या कर्जाची रक्कम परत मागितली आहे. या धक्क्यात पाकिस्तान असतानाच आता युएईने अजून एक धक्कादायक पाऊल उचलल्याचे बघायला मिळत आहे.

48 तासाच्या आत देश सोडा.. संयुक्त अरब अमिरातीची धक्कादायक घोषणा, जगात मोठी खळबळ, कर्मचाऱ्यांना..
UAE
| Updated on: May 01, 2026 | 2:09 PM
Share

संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. युएईने थेट पाकिस्तानला त्यांनी दिलेले कर्ज परत मागितले. ज्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लवकरात लवकर पैसे परत द्या नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे युएईकडून सांगण्यात आले. संयुक्त अरबने पाकिस्तानविरोधात भूमिका घेतली. हेच नाही तर ही रक्कम परत देण्याकरिता पाकिस्ताने युएईला वेळ मागितली. मात्र, तो वेळही देण्यास युएईने नकार दिला. त्यामध्येच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. एतिहाद एअरवेजने अबू धाबीमध्ये काम करणाऱ्या 15 पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांना फक्त नोकरीवरून काढण्यातच आले नाही तर त्यांना 48 तासांच्या आत संयुक्त अरब अमिराती सोडण्याच्या सूचना जारी करण्यात आली. त्यापैकी एक कर्मचारी तब्बल 20 वर्षांपासून एतिहाद एअरवेजवर काम करत.

मुळात म्हणजे कंपन्या कर्मचाऱ्यांना काढताना काही नियमांचे पालन करतात. मात्र, या केसमध्ये तसे काहीच करण्यात आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांना एचआरने बोलावले नव्हते तर इमिग्रेशन कार्यालयाने बोलावले होते. 48 तासात कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला युएई सोडावी, लागेल असे स्पष्टपणे त्यांना सांगण्यात आले. तसे त्यांना आदेश देण्यात आली.

आपली कोणतीही बाजू मांडण्याची संधीही या कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. ज्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचे सांगितेल जाते. विशेष म्हणजे नोकरी करणारे सर्वजण वेगवेगळ्या पदावर काम करणारे पाकिस्तानी नागरिक आहेत. मुळात म्हणजे यापैकी जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय दुबईत आहे. अचानक अशाप्रकारे युएई सोडावे लागल्याने त्यांच्यापुढे संकट आहे.

इतक्या कमी वेळात हे सर्व करणे म्हणजे त्यांच्यापुढे आव्हान आहे. धक्कादायक म्हणजे इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी यांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश दिले. संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानकडून 3 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्ज परत करण्याची मागणी केली. ज्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं