AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणवर हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सैन्य हायअलर्टवर, दोन्ही देशांमधील तणाव वाढला

Pakistan vs Iran : इराण आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील सैन्य हायअलर्टवर आहे. इराणने आधी पाकिस्तानमच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानने देखील इराणवर हल्ला केला आणि दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

इराणवर हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सैन्य हायअलर्टवर, दोन्ही देशांमधील तणाव वाढला
| Updated on: Jan 18, 2024 | 5:23 PM
Share

Iran-Pakistan War : इराण आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळेच दोन्ही देशाचे लष्कर आता हायअलर्टवर आहेत. पाकिस्तानने इराणला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने सैन्य हाय अलर्टवर असल्याचे म्हटले आहे. इराणच्या कोणत्याही कृतीला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे पाकिस्तानने म्हटले आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार,  पाकिस्तान आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्कर अलर्टवर आहे. पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे इराणमधील दहशतवादी तळांवर केलेले हल्ले अतिशय प्रभावी होते. लष्कराने ड्रोन आणि रॉकेटने हल्ले केले होते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटले होते की, सैन्याने इराणमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू केले आहे. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.

पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इराणने पाकिस्तानला समन्स पाठवले आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने म्हटले आहे की, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांचा इराणने तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानलाही तातडीने स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

इराणमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी सांगितले की तेहरानमध्ये उपस्थित असलेले पाकिस्तानचे सर्वात वरिष्ठ मुत्सद्दी आणि पाकिस्तानचे डी’अफेअर्स प्रभारी यांना स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

मंगळवारी इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हवाई हल्ला केला होता. इराणच्या सरकारी न्यूज एजन्सी मेहरच्या म्हणण्यानुसार, इराणने जैश उल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केले होते.

पाकिस्तानकडून प्रत्युत्तराची कारवाई

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, दहशतवाद्यांबाबत त्यांनी इराणशी अनेकदा चर्चा केली. पण तरी कुठलीही कारवाई झाली नाही. इराणमध्ये वाढणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानविरुद्ध मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर आम्ही ही कारवाई केली आहे. इराणच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आम्ही पूर्ण आदर करतो.

आजच्या कारवाईचा एकमेव उद्देश पाकिस्तानचे राष्ट्रीय हित हे होते, जे पाकिस्तानसाठी सर्वोपरि आहे. यात तडजोड करता येणार नाही.

इराणला पाकिस्तानने आपला भाऊ म्हटले आहे. पाकिस्तानच्या लोकांना इराण आणि इराणी लोकांबद्दल खूप आदर आणि आपुलकी आहे. दहशतवादाच्या धोक्यासह इतर आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही नेहमीच संवाद आणि सहकार्यावर भर दिला आहे. हा प्रश्न परस्पर सोडवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील राहतील. असे ही पाकिस्तानने म्हटले आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.