AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Protests: पशुपतिनाथ मंदिराबद्दल मोठा निर्णय, काठमांडूचे विमानतळ लष्कराच्या ताब्यात, जाणून घ्या नेपाळमधील महत्वाच्या 3 घटना

नेपाळमध्ये मोठा हिंसाचार बघायला मिळाला. सरकारी कार्यालय ते न्यायपालिकांना आंदोलकांनी टार्गेट केले. तरुण पिढी सरकारविरुद्ध भयंकर हिंसक निदर्शने करत आहे. हेच नाही तर आता लष्कराने सूत्रे हातात घेतली आहेत. काही भारतीय नागरिक नेपाळमध्ये अडकून पडले आहेत.

Nepal Protests: पशुपतिनाथ मंदिराबद्दल मोठा निर्णय, काठमांडूचे विमानतळ लष्कराच्या ताब्यात, जाणून घ्या नेपाळमधील महत्वाच्या 3 घटना
Nepal Protests
| Updated on: Sep 10, 2025 | 10:23 AM
Share

नेपाळमध्ये हाहा:कार सुरू आहे. तरुण पिढी सरकारविरुद्ध भयंकर हिंसक निदर्शने करत आहे. पंतप्रधानांच्या घरात घुसून धुमाकूळ घालण्यात आलाय तर काही मंत्र्यांना थेट रस्त्यावर काढून त्यांना जमावाने मोठी मारहाण केली. सध्याच्या स्थितीला नेपाळमधील स्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक नेत्यांनी देश सोडून पळ काढलाय. नेपाळमध्ये परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मोठ्या गदारोळानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. लष्कराने हातात कायदा सुव्यवस्था हातात घेतलीये. हेच नाही तर नेपाळच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताने अलर्ट मोड जारी केलाय. सीमा भागात सुरक्षा वाढवली आहे. नेपाळमधील नागरिकांना शांत राहण्याचे आव्हान केले जातंय. नेपाळमधील सध्याच्या परिस्थितीवर भारतात मोठी बैठक पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील संघर्षात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 500 हून अधिक लोक हे जखमी आहेत. संसदेला निदर्शकांनी आग लावली. अनेक मंत्र्यांच्या घरांना देखील टार्गेट करण्यात आले. या परिस्थितीमध्ये अनेक देशांनी आपल्या नागरिकांना नेपाळमध्ये सध्या जाणे टाळण्यास सांगितले. मंगळवारी तरुणांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाला टार्गेट करत आग लावली.

  1. नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिर या हिंसक निदर्शनानंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हेच नाही तर मंदिराच्या परिसरात लष्कर तैनात करण्यात आलंय. निदर्शक मंदिरालाही टार्गेट करू शकतात, या पार्श्वभूमीवर. यासोबतच इतरही काही मंदिरांची सुरक्षा वाढवली आहे.
  2. पंतप्रधान, राष्ट्रपती कार्यालय यामध्येही निदर्शन करणाऱ्यांनी आग लावली. अनेक सरकारी मालमत्तेचे नुकसान देखील त्यांनी केले. हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधील सर्व विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ लष्कराने ताब्यात घेतले.
  3. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधील जेलमधील कैदी हे पळून गेल्याचे सांगितले जाते. मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनांमुळे, तुरुंगातून मोठ्या प्रमाणात कैदी पळून गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. 900 कैद्यांनी जेलमधून पळ काढला आहे. मात्र, याबद्दल अजून काही माहिती मिळू शकली नाही.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?