AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्कायडायविंगचा थरार अनुभवण्यासाठी आकाशातून जमिनीच्या दिशेने झेप घेण्याआधीच 12 जणांवर काळाची झडप

स्कायडायविंगचा थरार अनुभवण्याआधीच 12 जणांवर काळाने झडप घातली. स्कायडायविंग हा एक साहसी क्रीडा प्रकार आहे. आयुष्यातला हा एक वेगळा रोमांचक अनुभव असतो. पण 12 जणांना हा थरार, रोमांच अनुभवण्याआधीच काळाने गाठलं.

स्कायडायविंगचा थरार अनुभवण्यासाठी आकाशातून जमिनीच्या दिशेने झेप घेण्याआधीच 12 जणांवर काळाची झडप
Representative Image Image Credit source: ANI
| Updated on: Jun 15, 2026 | 8:34 AM
Share

अमेरिकेच्या मिसौरी मध्ये एका छोट्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला. विमानातील 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बटलर मेमोरियल एअरपोर्ट जवळ हा अपघात झाला. विमान कोसळताच लगेच आग लागली. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक लगेच घटनास्थळी पोहोचलं. पण कोणालाही वाचवता आलं नाही. रविवारी ही दुर्घटना घडली. विमानातील सर्व सदस्य स्कायडायविंगसाठी निघाले होते. स्कायडायविंगचा थरार ते अनुभवणार होते. पण त्या आधीच ही दुर्घटना घडली. मिसौरी स्टेट हायवे पेट्रोलने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलय की, आमचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. बटलर पोलीस डिपार्टमेंट आणि बेट्स काउंटी शेरिफ ऑफिसची मदत करत होते. बटलर मेमोरियल एअरपोर्ट जवळ हे विमान कोसळलं. बटलर कॅनसस सिटीपासून जवळपास 65 मैल दक्षिणेला आहे.

“या विमानातून प्रवासी स्कायडायविंगसाठी चालले होते. रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास इमर्जन्सी सर्विसला प्लेन क्रॅश होऊन आग लागल्याची सूचना मिळाली” अशी माहिती मिसौरी हायवे पेट्रोलचे सार्जेंट जस्टिन इविंग यांनी दिली. इमर्जन्सी सर्विसने विमान कोसळून आग लागल्यानंतर काही वेळातच ही आग विझवली अशी माहिती इविंग यांनी दिली. घटनास्थळावरचं दृश्य भयानक असल्याचं त्यांनी सांगितलं. विमानतळाजवळ एका शेतात हे विमान कोसळलं. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या विमान अपघाताची चौकशी करणार आहे.

किती साली बनवण्यात आलेलं हे विमान?

पॅसिफिक एअरोस्पेस 750XL हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. ते एक सिंगल इंजिन टर्बोप्रॉप प्लेन मॉडल आहे. स्कायडायविंगसाठी या विमानाचा वापर केला जातो. त्या शिवाय कार्गो, एरियल सर्वे आणि मेडिकल इमर्जन्सीमध्ये सुद्धा हे विमान फायद्याचं ठरलं आहे. 17 स्कायडायवर्स या विमानातून जाऊ शकतात. छोट्या रनवेवरुन टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी हे विमान सक्षम आहे. FAA रेकॉर्डनुसार, शनिवारी कोसळलेलं विमान 2010 सालचं मॉडलं होतं.

स्कायडायविंगचा सीजन कधी सुरु होतो?

या विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचं वय आणि शहर या बद्दल अजून माहिती मिळालेली नाही.बटलर हे छोट्स शहर असून त्याची लोकसंख्या 4300 आहे. या भागात स्कायडायविंग कंपन्या 8 ते 9 महिने काम करतात. मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला इथे स्कायडायविंगचा सीजन सुरु होतो. ऑक्टोंबर-नोव्हेंबर पर्यंत हा सीजन चालतो.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?