AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM नरेंद्र मोदींना कॅनडाकडून G7 संमेलनाचे आमंत्रण, G7 परिषद म्हणजे काय?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने कॅनडाकडून G7 संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडात होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

PM नरेंद्र मोदींना कॅनडाकडून G7 संमेलनाचे आमंत्रण, G7 परिषद म्हणजे काय?
PM Modi G7
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 06, 2025 | 7:19 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने कॅनडाकडून G7 संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे.कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी फोन करुन मोदींना बैठकीचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता कॅनडात होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. G7 संमेलन नेमकं काय आहे? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांच्यात फोनवरून संभाषण झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्नी यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले.यावेळी कार्नी यांनी पंतप्रधान मोदींनी या महिन्याच्या अखेरीस कॅनडातील कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.

याबाबत माहिती देताना पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, ‘कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.’

येथे पहा मोदींची पोस्ट

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की,’जिवंत लोकशाही आणि लोकांमधील खोल संबंधांनी जोडलेले भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि सामाजिक हितसंबंधांच्या आधारे नवीन उर्जेने एकत्र काम करतील. मी शिखर परिषदेत पंतप्रधान कार्नी यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.’

G7 शिखर संमेलन म्हणजे काय?

G7 शिखर संमेलन हे सात प्रमुख औद्योगिक देशांचा एक गट आहे. या संमेलनात G7 गटातील सात प्रमुख देशांचे राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुख प्रमुख जागतिक व धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करतात. तसेच काही समस्या असेल तर उपाय काढण्यासाठी एकत्र काम करतात. यातील देश इतर देशांच्या प्रमुखांनाही बैठकीसाठी निमंत्रित करत असतात. यंदा हे संमेलन कॅनडात होणार असल्याने कॅनडाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी आमंत्रण दिले आहे.

G7 मध्ये कोणत्या देशांचा समावेश आहे?

G7 मध्ये इटली, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियन देखील या संमेलनात सहभागी होत असते. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष शिखर परिषदेत त्यांचे प्रतिनिधित्व करतात. यामुळे जागतिक प्रश्न सुटण्यास मदत होते.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं